

कन्नड तालुक्यातील गराडा येथे रात्री बिबटयाच्या हल्ल्यात (Leopard In Kannad) दहा शेळया ठार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकूण दहा शेळ्या ठार झाल्या असून संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यरात्री सुमारास मौजे गराडा येथील गट क्रं. ४७ मधील साहेबराव गब्बा राठोड, कवरचंद दिपचंद राठोड आणि ऊत्तम बिबचंद राठोड यांच्या मालकीच्या एकूण दहा शेळ्या होत्या. रात्रीच्या सुमारास बिबट्याने या ठिकाणी येवून या शेळयांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. (Leopard In Kannad)
या घटनेची माहीती मिळताच, वन विभागाचे मोइद्दीन शेख व अशोक आव्हाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गांधले व डॉ. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन अधिकारी बाजीराव राठोड यांनी दोन पंचासमक्ष सदर परिक्षेत्राची पाहणी करून पंचनामा केला. या हल्ल्यात राठोड बंधूंचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे ही वाचा :