काणकोण मतदारसंघ : मातब्बर नेता मारणार बाजी की नवखा घेणार फायदा?

काणकोण मतदारसंघ : मातब्बर नेता मारणार बाजी की नवखा घेणार फायदा?
Published on
Updated on

गोवा मुक्‍तीपासून एकसंघ असलेल्या काणकोण मतदारसंघाचे 1989 साली विभाजन करण्यात आले. तालुक्यात काणकोण व पैंगीण असे दोन मतदारसंघ झाले. 1989 झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैंगीण मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून वासू पाईक गावकर विजयी झाले. तर काणकोण मतदारसंघात म.गो.पक्षाचे उमेदवार संजय बांदेकर विजयी झाले. यावेळच्या निवडणुकीत मातब्बर नेत्यांसह काही नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. यातील इजिदोर फर्नांडिस, विजय पै खोत, रमेश तवडकर यांच्यात चुरस होणार हे नक्की आहे. मात्र, हे तिन्ही उमेदवार एकेकाळी एकाच पक्षात होते. त्यामुळे मतविभागणीचा फायदा नवख्या उमेदवाला होतो की, या मातब्बर नेत्यांपैकी कोण एक बाजी मारतो, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

1989 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत काणकोण मतदारसंघात काणकोण नगरपालिका, श्नीस्थळ पंचायत, आगोंद पंचायत आणि खोला पंचायतीचा समावेश करण्यात आला. तर पैंगीण मतदारसंघात पैंगीण, लोलय-पोळे, खोतीगाव आणि गावडोंगरी पंचायत क्षेत्राचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 2012 साली पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. खोला पंचायत वगळून परत काणकोण एक मतदारसंघ करण्यात आला.त्यापर्वी म्हणजे 2007 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काणकोणचे आमदार म्हणून भाजपचे विजय पै खोत निवडून आले होते. तर पैंगीण मतदार संघाचे आमदार म्हणून रमेश तवडकर विजयी झाले होते.

2012 च्या विधानसभा निवडणुकीत विजय पै खोत हे ज्येष्ठ तसेच काणकोण मतदारसंघात कमळ फुलविण्यात ज्यांचा हात होता, त्या विजयना डावलून भाजपाने पैंगीण मतदारसंघाचे आमदार असलेल्या रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पै खोत यांनी भाजपसाठी काम केले आणि रमेश तवडकर विजयी झाले.

मात्र, 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश तवडकर यांना भाजपने उमेदवारी नाकरली आणि विजय पै खोत यांना दिली. नाराज रमेश तवडकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. भाजपच्या मतांची विभागणी होऊन काँग्रेसचे इजिदोर फर्नांडिस विजयी झाले.त्यानंतर इजिदोर भाजपत गेले. मात्र, यावेळी भाजपने इजिदोर यांना उमेदवारी नाकारून रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली आहे.

या मतदारसंघातून इजिदोर फर्नांडिस, विजय पै खोत, रमेश तवडकर परत एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.त्यांच्यासह विविध पक्षाचे अन्य पाच उमेदवार म्हणून एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गोव्यात 2012 साली भाजपचे सरकार आले आणि स्व.मनोहर पर्रीकर यांच्या मंत्री मंडळात रमेश तवडकर यांना कृषी, क्रीडा, आदिवासी कल्याण सारखी महत्त्वाची खाती मिळाली. 2002 ते 2012 पर्यंत काणकोणच्या आमदारपदी विजय पै खोत रहिले.त्यांना केवळ दोन वर्षे सत्ता मिळाली. 2017 ते 2022 पर्यंत काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस रहिले. या निवडणुकीत इजिदोर फर्नांडिस, रमेश तवडकर, विजय पै खोत यांच्या मध्ये लढतीमध्ये नवीन उमेदवार बाजी मारतो ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पाहा व्हिडिओ : कोण आहे सिद्धार्थ जाधवची क्रश ? | Rapid fire with Sidharth Jadhav

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news