म्हापसा : कळंगुट येथे सुपर मार्केट जळून खाक; 70 लाखांचे नुकसान.

कळंगुट : येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेले सुपर मार्केटमधील साहित्य.
कळंगुट : येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेले सुपर मार्केटमधील साहित्य.

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : कळंगुटमधील बॉम्बे बाजार या घरगुती वापराच्या वस्तूंचे सुपर मार्केट जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे 70 लाखांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. ही आग शॉर्टसर्किट की आणखी कोणत्या कारणास्तव लागली हे समजू शकलेले नाही.

पिळर्ण अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मंगळवारी पहाटे 4.30 वा.च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने संपूर्ण सुपर मार्केटला वेढले होते. आगीचे लोळ दुकानातून बाहेर पडत होते. दलाच्या जवानांनी अतिरिक्त मदत मागवली. वीज कर्मचार्‍यांनी धाव घेत घटनास्थळी परिसरातील वीजपुरवठा खंडित केला.
अग्निशामक दलाचे अधिकारी रूपेश सावंत यांनी पिळर्ण, म्हापसा व पणजी मुख्यालयाच्या जवानांच्या मदतीने व चार पाण्याच्या बंबांचा वापर करून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.

कळंगुट : येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेले सुपर मार्केटमधील साहित्य.
कळंगुट : येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेले सुपर मार्केटमधील साहित्य.

दुकान मालक एडविन रॉड्रिग्ज यांनी कळंगुट पंचायत घरासमोर हॉटेल कळंगुट टॉवरच्या बाजूला चार दुकाने एकत्रित करून हे बॉम्बे बाजार सुपरमार्केटवजा दुकान सुरू केले होते. बेड, बेडशिट, स्टोव्ह, शेगडी, सर्वप्रकारचे प्लास्टिकचे व घरगुती वापरातील साहित्य या दुकानात होत्या. त्या सर्व जळून खाक झाल्याने सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय या दुकानाच्या समोर पार्क करून ठेवलेली चारचाकी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेचा पंचनामा कळंगुट पोलिस हवालदार विशाल गावस यांनी केला.

आगीच्या भक्ष्यस्थानी…

  • बेड, बेडशिट, स्टोव्ह, शेगडी, प्लास्टिकचे व घरगुती वापरातील साहित्य.
  • दुकानाच्या समोर पार्क करून ठेवलेली चारचाकीदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी.
  • पिळर्ण अग्निशामक दल व वीज कर्मचार्‍यांनी वेळीच धाव

हेही वाचलतं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news