गोवा : उत्पल पर्रीकरांविरोधात उमेदवार देणार नाही-संजय राऊत | पुढारी

गोवा : उत्पल पर्रीकरांविरोधात उमेदवार देणार नाही-संजय राऊत

पणजी : पुढारी वृत्तसेवा

उत्पल पर्रीकर यांच्‍या विरोधात उमेदवार देणार नाही. भाजपच्या यादीशी आमचा संबंध नाही. शिवसेनेच्या १० उमेदवारांची यादी तयार आहे. आम्ही गोव्यात लढू आणि जिंकू, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बाेलत हाेते.

फडणवीस यांनी राऊत यांना नटसम्राटची उपमा दिली होती. यानंतर राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. आम्ही नटसम्राट पण, शब्द फिरवणारे सोंगाडे नक्कीच नाही. कुणी मला खुर्ची देता का खुर्ची अशी अवस्‍था देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे, अशा शब्‍दात त्‍यांनी फडणवीसांवर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या, आम्‍ही त्‍यांच्‍याकडे लक्ष देत नाही, असेही त्यांनी नमूद केलं. नगरपंचायतीच्या निकालाकडे महाविकास आघाडीच्या अनुषंगाने पाहतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचलं का? 

Back to top button