गव्हाणच्या जवानाचा लखनऊ येथे उपचारादरम्यान मृत्यू

गव्हाणच्या जवानाचा लखनऊ येथे उपचारादरम्यान मृत्यू

Published on

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

गव्हाण (ता तासगाव) येथील अमोल एकनाथ पवार (वय ३०) या जवानाचा सेवेत असताना मंगळवारी उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे मृत्यू झाला. तेथील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते.

अमोल पवार हे लखनऊ येथे युनिट- ५ मध्ये नाईक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा आणि दोन बहिणी असा परिवार आहे. गुरुवारी गव्हाण येथे विठ्ठलनगर भागामध्ये शासकीय इतमामात अमोल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news