काशीचा श्री ढुंढिराज विनायक | पुढारी

काशीचा श्री ढुंढिराज विनायक

‘काशीस जावे, नित्य वदावे’ ही प्रत्येक हिंदूची मनोमनीची भावना. काशी हे महाक्षेत्र, पुण्यक्षेत्र! काशी विश्‍वेश्‍वरासह येथे असलेल्या देव-देवतांचे माहात्म्य शतकानुशतके गाजत आहे. या तीर्थ काशी क्षेत्रात विनायकाची पुराणोक्‍त 56 ठाणी आहेत. त्या सर्वांचा नायक म्हणजे ढुंढिराज विनायक होय! धर्म-अर्थ-काम-मोक्ष यांचा शोध घेत त्रिखंड धुंडणारा तो ढुंढिराज विनायक! त्याच्या दर्शनाशिवाय काशीयात्रा पूर्ण होत नाही.

भस्मासुराचा मुलगा दुरासद याचा आदिशक्‍तीच्या दिव्य तेजातून अवतार घेतलेल्या ढुंढिराजाने वध केला. देवांना संकटमुक्‍त केले. तेव्हा श्रीशंकराने ढुंढिराजाची काशीक्षेत्री प्रतिष्ठापना केली. ब्राह्मक्षेत्रामध्ये हे अत्यंत श्रेष्ठस्थान म्हणून मान्यता पावलेले आहे.

Back to top button