

गडचिरोली पुढारी वृत्तसेवा : काल रात्रीपासून पहाटेपर्यंत गडचिरोलीत मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. काल संध्याकाळी भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. आज सकाळपर्यंत पूर ओसरलेला नाही.
आज दिवसभर भामरागड तालुक्यात पाऊस सुरु होता. संध्याकाळी पर्लकोटा नदीला पूर आला. या पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. यामुळे परिसरातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. रात्रभरात पुराचे पाणी भामरागड गावातील बाजारपेठेत शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक १६० मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल सिरोंचा तालुक्यात १३८ मिलिमीटर, तर अहेरी तालुक्यात १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हेही वाचलंत का?