

जेरुसलेम; पुढारी ऑनलाईन : जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीमध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली पोलिसांमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आला आहे. शुक्रवारी झालेल्या या संघर्षात ४२ जण जखमी झाले. पॅलेस्टाईनच्या रेड क्रॉस संघटनेने सांगितले की, या ठिकाणी बराच वेळ तणाव होता. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ही हाणामारी झाली. रेड क्रॉसने सांगितले की २२ जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
इस्रायली पोलिसांनी सांगितले की, दंगलखोरांनी पश्चिम भिंतीच्या बाजूला दगड आणि फटाके फेकले तेव्हा पोलिसांना कंपाऊंडमध्ये प्रवेश करावा लागला. अल-अक्साच्या पश्चिमी भिंतीखाली, अल-अक्सा हे ज्यूंचे पवित्र स्थान आहे.
दंगल शांत करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी दंगलविरोधी पद्धती वापरल्या, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी एएफपीला सांगितले की, पोलिसांनी अश्रूधुराचा आणि रबरी गोळ्यांचा वापर केला. पोलिसांनी सांगितले की, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, "या ठिकाणी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि मुस्लिम उपासक सुरक्षित मशिदीत प्रवेश करत आहेत, पण जुन्या जेरुसलेममध्ये तणाव कायम आहे. इस्रायलच्या ताब्यातील पूर्व जेरुसलेमचा हा भाग आहे.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये अल-अक्साच्या कंपाऊंडमध्ये झालेल्या संघर्षात सुमारे ३०० पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. अल अक्सा मशीद हे मुस्लिमांसाठी तिसरे पवित्र स्थळ आहे आणि ज्यूंसाठी ते सर्वात पवित्र स्थळ आहे जे त्याला टेंपल माउंट म्हणतात.
रमजानच्या काळात इस्त्रायलने या ठिकाणावर केलेल्या हल्ल्याने जगभरात चिंता वाढवली आहे. पण जेरुसलेममध्ये अस्थिरता पसरवण्याच्या तयारीत असलेल्या इस्लामिक गट हमास आणि इस्लामिक जिहादच्या विरोधात पावले उचलण्यास भाग पाडण्यात आले, असे इस्रायल या ज्यू राष्ट्राचे म्हणणे आहे.
तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड यांनी भर दिला की सरकार परिस्थिती जैसे थे राखण्यासाठी वचनबद्ध आहे. याचा अर्थ असा आहे की अल-अक्सामध्ये केवळ मुस्लिमांना प्रार्थना करण्याची परवानगी असेल असा दीर्घकालीन करार स्वीकारणे. तर ज्यू टेंपल माउंट (वेस्टर्न वॉल) वर जाऊ शकतात. मुस्लिम नेत्यांना मात्र ज्यूंची आवक वाढल्याचा राग आहे. त्यांना भीती वाटते की इस्रायल अल-अक्सा कंपाऊंडचे विभाजन करण्याच्या तयारीत आहे जेथे ज्यू देखील प्रार्थना करू शकतात. लॅपिड यांनी मात्र अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.
इस्रायली-व्याप्त जेरुसलेममधील हिंसाचारामुळे अल-अक्सा वरील समान वादानंतर इस्रायल आणि सशस्त्र गट हमास यांच्यात ११ दिवस संघर्ष झाला होता. तशाच एका युद्धाची भीती वाढली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागण्यात आले होते, ज्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिले, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही.
२२ मार्च रोजी इस्रायल आणि कब्जा केलेल्या वेस्ट बँकमधील हिंसाचारानंतर अल-अक्सामध्ये पुन्हा संघर्ष झाला आहे. या हिंसाचारात इस्रायलमध्ये १२ इस्रायली ठार झाले. त्यापैकी चार वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये एक अरब-इस्रायली पोलिस अधिकारी आणि दोन युक्रेनियन ठार झाले. यापैकी दोन हल्ले पॅलेस्टिनींनी तेल अवीवमध्ये केले होते.
यादरम्यान २६ पॅलेस्टिनी आणि तीन इस्रायली-अरब मारले गेले. यामध्ये हल्लेखोर आणि वेस्ट बँक ऑपरेशनमध्ये इस्रायली सुरक्षा कर्मचार्यांनी मारले गेलेल्यांचा समावेश आहे.
हे ही वाचलं का ?