देशात ‘तालिबानी उन्माद’ शिगेला ; आता पंजाबमध्ये नंग्या तलवारी नाचवत दोन समुदाय भिडले | पुढारी

देशात 'तालिबानी उन्माद' शिगेला ; आता पंजाबमध्ये नंग्या तलवारी नाचवत दोन समुदाय भिडले

चंदीगड; पुढारी ऑनलाईन : पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी दुपारी मिरवणुकीवरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. गोंधळ एवढा वाढला की दोन्ही बाजूंनी दगड, तलवारीचा मारा सुरू झाला. यामध्ये किनाऱ्यासह तिघे जखमी झाले. पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी एसएसपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात खलिस्तानी अँगलही समोर येत आहे. वृत्तानुसार, गोंधळादरम्यान खलिस्तान समर्थक घोषणाही दिल्या जात होत्या.

भांडणाचे मूळ काय होते ?

खरं तर, खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पुन्नूने शुक्रवारी खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. पुन्नूने हरियाणाच्या डीसी कार्यालयात झेंडे फडकवण्याची घोषणा केली होती. शिवसेनेने याविरोधात पटियाला येथे खलिस्तानी मुर्दाबाद मार्च काढण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी दुपारी शिवसेनेने मोर्चा काढला, तर दुसरीकडे खलिस्तान समर्थकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे तणाव वाढला आणि त्यानंतर दगडफेक आणि गोंधळ सुरू झाला.

एकमेकांवर दगडफेक आणि तलवारीने हल्ला

यानंतर रस्त्यावरच दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दगड आणि तलवारी नाचू लागल्या. पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळली. यावेळी पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने परस्थिती हाताळली आणि जास्त बळाचा वापर केला नाही. यादरम्यान छतावरून दगडफेक सुरूच होती. त्याचवेळी खलिस्तान समर्थक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तलवारी चालवण्यास सुरुवात केली. या चकमकीत एक एसएचओ जखमी झाला.

हे ही वाचलं का ?

Back to top button