दिल्‍लीत मेट्रो आणि रुग्णालयांचा वीज पुरवठा बाधित होण्याची शक्यता | पुढारी

दिल्‍लीत मेट्रो आणि रुग्णालयांचा वीज पुरवठा बाधित होण्याची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : कडक उन्हाळ्यामुळे एकीकडे विजेच्या मागणीत झालेली वाढ तर दुसरीकडे कोळशाच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे उत्पादनात झालेली घट या पार्श्‍वभूमीवर अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद होऊ लागले आहे. दरम्यान येत्या काळात पुरेशा प्रमाणात वीज प्राप्‍त झाली नाही तर मेट्रो रेल्वे आणि रुग्णालयांचा वीज पुरवठा बाधित होऊ शकतो, असा इशारा दिल्‍ली सरकारने दिला आहे.

दिल्‍लीतील वीज पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे ऊर्जा प्रकल्पांना पुरेसा कोळसा पुरवठा करण्याची मागणी केली. दादरी-2 तसेच उंचाहार ऊर्जा प्रकल्पातील वीजनिर्मिती कमी होऊ शकते. या दोन प्रकल्पांतून दिल्‍लीला लागणार्‍या 25 टक्के विजेचे उत्पादन केले जाते, अशी माहितीही त्यांनी दिली.

एनटीपीसीच्या दादरी-2 तसेच झज्जर या दोन प्रकल्पांची निर्मिती प्रामुख्याने दिल्‍लीला वीज पुरवठा करण्यासाठी झाली होती. दादरी, उंचाहार, कहलगाव, फराक्‍का आणि झज्जर या प्रकल्पांतून दिल्‍लीला दररोज 1751 मेगावॅट इतका वीजपुरवठा केला जातो. यातील दादरी प्रकल्पातून सर्वाधिक 728 मेगावॅट तर उंचाहार प्रकल्पातून 100 मेगावॅट इतका विजेचा पुरवठा केला जातो.

पहा व्हिडीओ : राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आत्मे एकत्र आलेत – संजय राऊत यांची टीका

Back to top button