

पुढारी ऑनलाईन डेस्क : गायक राहुल जैनविरोधात (rahul jain) मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची केस दाखल केलीय. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. एका कॉस्ट्युम स्टायलिस्टने राहुलवर आरोप केला आहे की, त्याने आपल्या घरी तिच्यावर अत्याचार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुलने एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, सर्व आरोप 'फेक आणि निराधार' आहेत.
महिलेच्या तक्रारीनुसार, राहुलने तिला मुंबईतील अंधेरी भागातील आपल्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना २०२० ची असल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा ती ड्रेस डिझायनर जैन यांच्या घरी कामानिमित्त गेली होती. (rahul jain)
या तक्रारीनंतर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात राहुल जैनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रिपोर्ट्समध्ये असे समोर येत आहे की, जेव्हा ती महिला राहुलच्या घरी पोहोचली. तेव्हा त्याने तिथे तिच्यावर बलात्कार केला.
राहुलवर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही राहुलवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. आरोप करणाऱ्या बॉलीवूड गीतकाराने तक्रारीत बलात्कार तसेच जबरदस्तीने गर्भपात आणि फसवणूक झाल्याचे म्हटले होते.
राहुलला २०१४ मध्ये लोकप्रियता मिळाली. जेव्हा तो MTV Aloft Star शोमध्ये दिसला. 'तेरी याद' (ताप), 'आने वाले कल' (१९२१) आणि 'घर से निकला', 'ना तुम रहे ना हम' आणि 'चल दिया' या वेब सीरिज स्पॉटलाईटसाठी त्याने गाणी गायली आहेत. राहुलने संगीतकार म्हणूनही काम केले आहे. 'कागज' आणि 'झूठा कहीं का' आणि काही वेब सिरीजसाठीही त्याने गाणी संगीतबद्ध केली आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगताना राहुलने या महिलेला ओळखत नसल्याचे म्हटले आहे. त्याने या डिझायनरचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. राहुल म्हणाला, 'याआधीही एका महिलेने माझ्यावर असे आरोप केले होते पण मला न्याय मिळाला. ही महिला त्या महिलेची जोडीदार असू शकते.