खातेवाटपावरून कुणीही नाराज नाही : शंभूराज देसाई | पुढारी

खातेवाटपावरून कुणीही नाराज नाही : शंभूराज देसाई

मुंबई : पुढारी ऑनलाईन : खातेवाटपावरून कुणीही नाराज नसल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. चांगल्या वातावरणात अधिवेशन पार पडेल. खातेवाटपाचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे. जाणीवपूर्वक काहीतरी वावड्या उठवल्या जाताहेत, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.

बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार कामकाज राहील. जे ५० जण शिंदे गटात गेले, त्यांना मंत्रीपद आणि काही ना काही हवे म्हणून गेले, असेही त्यांनी नमूद केले.

आमदार संतोष बांरांकडून झालेल्या चुकीवर शंभूराज देसाई म्हणाले- संतेष बांगरांकडून अनावधानाने मारहाण झाली असेल. हात उगारणं योग्य नाही.

दरम्यान, हिंगोली येथे बांधकाम कामगारांसाठी खराब झालेल्या पोळ्या, करपलेला भात अन् निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. हे पाहून संतापलेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन कंपनीच्या व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली. कामगारांच्या आरोग्याशी खेळू नका, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

 

Back to top button