भारत जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था; स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये साधली देदीप्यमान प्रगती

भारत जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था; स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये साधली देदीप्यमान प्रगती

मुंबई; पुढारी डेस्क : स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये भारताने अनेक क्षेत्रांत देदीप्यमान प्रगती साधली आहे. त्यात अर्थव्यवस्थेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सद्यस्थितीत भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. 3.17 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला भारत अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनच्या मागे आहे.

75 वर्षांच्या काळात भारताने पायाभूत क्षेत्रांमध्ये मोठी झेप घेतली आहे. इतकेच नव्हे तर जगातील प्रगत देशांच्या यादीमध्ये आता भारताचे नाव घेतले जाऊ लागले आहे. ब्रिटिश काळात मोठी साधन संपत्ती देशाबाहेर नेण्यात आली. औद्योगिक क्रांतीच्या काळात हीच संपत्ती देशाबाहेर गेल्याने लोकांचे जीवनमान प्रचंड खालावले होते. सर्वत्र गरिबी जाणवत होती. मात्र स्वांतत्र्यानंतर आखण्यात आलेल्या धोरणांमुळे देशाने सातत्याने प्रगती साधली आहे. मात्र या काळात देशाने जवळपास 5 युद्धे झेलली. 1981, 1991 आणि त्यानंतर 2008 मध्ये आलेल्या जागतिक मंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तडाखे बसले, त्यानंतर नोटबंदी आणि कोरोनाची साथ यामुळे जगाबरोबर भारतालाही प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला त्यात भर पडली ती रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने. मात्र या सर्वांवर मात करत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून देशाने आपला लौकिक वाढवला आहे. पुढील वर्षी देखील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राहिल असा अंदाज जागतिक नाणेनिधीने वर्तवला आहे. 2023 च्या आर्थिक वर्षात देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न 8 ते 8.5 टक्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे.

स्वातंत्र्यानंतर देशाचे दरडोई उत्पन्न 500 पटीने वाढले आहे. हे देशाच्या प्रगतीचे ठळक निदर्शक मानले जाते. 1947 मध्ये 265 लोक असलेले दरडोई उत्पन्न आता 1,28,829 वर पोहचले आहे. अंतराळ संशोधनात भारताने मोठी झेप घेतली आहे. भारताची संस्था इस्त्रोकडून जगभरातील अनेक देश आता अंतराळ संशोधन विकत घेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news