

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी ग्रुप जी मध्ये स्वित्झर्लंडने सर्बियाचा ३-२ असा पराभव केला. या विजयाने स्वित्झर्डंने बाद फेरीत आपले स्थान निश्चित करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. स्विस टीमने फिफा विश्वकचषकमध्ये सलग तिसऱ्यांदा बाद फेरीपर्यंत मजल मारली आहे. ७ डिसेंबरला त्यांचा राऊंड ऑफ १६ सामना पोर्तुगाल सोबत होणार आहे.
रेमो फ्रीलरने केलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने सर्बियाचा पराभव केला. स्वित्झर्लंडच्या जेरडान शकीरीने संघाला सुरूवातीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सर्बियाने आक्रमक सरुवात करत १० मिनिटांत अलेक्सांद्र मित्रोविक आणि दुसान व्लाहोविक यांच्या गोलने डाव फिरवला होता. पूर्वार्धाच्या अखेरच्या काही सेकंदात स्वित्झर्लंडच्या एम्बोलोने गोल करून सामन्यात बरोबरी साधली. उत्तरार्धात रेमो फ्रीलर याने गोल करून स्वित्झर्लंडला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी तोडण्यासाठी सर्बियाने केलेले आक्रमण स्वित्झर्लंडने भक्कम बचाव करत परतवून लावले. अखेरीस सामना संपेपर्यंत स्वित्झर्लंड ३-२ आघाडी कायम करण्यात यशस्वी ठरला आणि याचबरोबर विजयावर शिक्कामोर्तब केला. सामन्यात मिळालेल्या विजयाने त्याने बाद फेरीत स्थान निश्चित केले.
हेही वाचा :