पुरुष फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘महिलाराज’ | पुढारी

पुरुष फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘महिलाराज’

कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनी आणि कोस्टारिका यांच्यात गुरुवारी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात फ्रेंच रेफ्री स्टेफनी फ्रापार्ट या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रेफ्री म्हणून काम करणार्‍या पहिल्या महिला रेफ्री ठरल्या आहेत. यांच्यासह फिफाने ब्राझीलच्या नुएजा बाक आणि मेक्सिकोच्या कॅरेन डियाझ मेडिना या दोन महिलांची मुख्य रेफ्री स्टेफनी फ्रापार्ट यांच्या सहायक रेफ्रीपदी निवड केली. या शिवाय अमेरिकेच्या कॅथरीन नेस्बिट या महिलेने व्हिडीओ असिस्टंट रेफ्री म्हणून काम पाहिले. त्यामुळे फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्यात चार महिलांनी रेफ्रीची धुरा सांभाळली. त्यामुळे या सामन्यावर एकप्रकारे महिलांचे वर्चस्व होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अल बायत स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या जर्मनी आणि कोस्टारिका सामन्यात चारही महिलांना रेफ्री म्हणून संधी देत एक नवा इतिहास घडवला. यासह यंदा विश्वचषकात रवांडाची सलिमा मुकानसांगा आणि जपानची योशिमी यामाशिता या महिलांचाही स्पर्धेच्या अधिकृत रेफ्रींच्या यादीत समावेश आहे.

Back to top button