

शिलाँग : पितृसत्ताक पद्धतीची आपल्याला ओळख आहेच; पण आपल्या देशातच एक समाज असा आहे ज्यामध्ये पुरुष नव्हे तर महिला कुटुंबप्रमुख (Female head households) असतात व त्यांच्यावरच घराची सर्व जबाबदारी असते. या समाजात लग्नानंतर मुलींना नव्हे तर मुलांची पाठवणी केली जाते!
भारतातील पुरुषप्रधान समाजासाठी ही बरीच वेगळी गोष्ट असू शकते. मात्र, खासी समाजासाठी हे नवे नाही. या समाजात मुलीच्या हातातच कुटुंबाची (Female head households) सत्ता असते. हा खासी समाज मेघालय व आसाममध्ये राहतो. या समाजात मुलाच्या नव्हे तर मुलीच्या जन्मानंतर विशेष आनंद साजरा होत असतो. घराच्या देखरेखीची सर्व जबाबदारी मुलीच्याच खांद्यावर असते. लग्नानंतर कुटुंबातील मुलगी नव्हे तर मुलगा नवा संसार थाटण्यासाठी घराबाहेर पडतो.
खासी समाजात मुली आपल्या आईचे नाव पुढे चालवतात. केवळ घरातीलच नव्हे तर घराबाहेरीलही कुटुंबाशी संबंधित सर्व जबाबदार्या मुलीच (Female head households) पार पाडतात. मुलांच्या नावापुढे वडिलांचे नव्हे तर आईचे नाव जोडले जाते. मुलगी जन्माला आल्यावर मिठाई वाटली जाते. विशेष म्हणजे कुटुंबात थोरल्या नव्हे तर सर्वात धाकट्या मुलीला सर्वात महत्त्वाची जबाबदारी दिली जाते. घरातील सर्वात छोट्या मुलीवर आई-वडिलांची जबाबदारी असते. याशिवाय धाकटी मुलगीच आपल्या भावंडांची व संपूर्ण कुटुंबाचीही जबाबदारी घेते.
हेही वाचा :