Stock Market Today | जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, सेन्सेक्स तेजीत, निफ्टी १८,२५० वर | पुढारी

Stock Market Today | जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, सेन्सेक्स तेजीत, निफ्टी १८,२५० वर

Stock Market Today : सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी तेजी आली. २०२२ च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय निर्देशांक ‍वधारुन खुले झाले. सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी वाढला होता. तर निफ्टीने १८,२५० वर व्यवहार केला.

टेक महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फायनान्स, विप्रो, बजाज फिनसर्व्ह हे टॉप गेनर्स होते. या शेअर्समध्ये ०.५ ते १ टक्क्यापर्यंत वाढ दिसून आली. टाटा मोटर्स, इन्फोसिस, एसबीआय, एचसीएल टेक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्सदेखील वधारले आहेत. तर एम अँड एम, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, आयटीसी, इंडसइंड बँक आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स घसरले आहेत.

अमेरिकेतील मुख्य निर्देशांक गुरुवारी वाढले होते. अमेरिकेतील बेरोजगारीच्या आकडेवारीने फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत ज्यामुळे महागाईशी लढा देण्यासाठी श्रमिक बाजाराची ताकद कमी होऊ शकते. गुरुवारी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज निर्देशांत १.०५ टक्क्याने, एस अँड पी १.७५ टक्क्याने आणि नॅस्डॅक कंपोझिट २.५९ टक्क्यांनी वाढला होता.

अमेरिकेच्या शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत आज बहुतांश आशियाई बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. जपानचा निक्केई ०.३५ टक्के व चीनचा शांघाय कंपोझिट ०.६१ टक्के वाढला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी १.९३ टक्क्याने घसरला. (Stock Market Today)

हे ही वाचा :

Back to top button