Sam Altman: ChatGPTच्या पाणी वापराचा दावा खोटा? सॅम ऑल्टमन यांचं स्पष्टीकरण ऐकून बसेल धक्का, नेमकं किती पाणी लागतं?

Sam Altman ChatGPT Water Usage: OpenAIचे CEO सॅम ऑल्टमन यांनी ChatGPTच्या एका प्रश्नासाठी सहा तास शॉवरएवढे पाणी खर्च होते, हा व्हायरल दावा फेटाळला आहे.
Sam Altman ChatGPT Water Usage
Sam Altman ChatGPT Water UsagePudhari
Published on
Updated on

Sam Altman ChatGPT Water Usage: AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत डेटा सेंटरमध्ये होणारा पाण्याचा वापर हा चर्चेचा आणि टीकेचा विषय बनला आहे. ChatGPT वर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागतं, असे दावे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या दाव्यांवर OpenAIचे CEO सॅम ऑल्टमन यांनी स्पष्टीकरण देत, हा दावा अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना ऑल्टमन यांनी ChatGPTच्या एका प्रश्नासाठी सहा तास शॉवर सुरू ठेवल्याइतके पाणी वापरले जाते, हा दावा फेटाळून लावला. त्यांच्या मते, प्रत्यक्ष पाण्याचा वापर व्हायरल दाव्यापेक्षा खूपच कमी आहे.

Sources Podcastच्या एका भागात ऑल्टमन यांनी सांगितले की, त्यांच्या माहितीनुसार सुमारे 38 हजार ChatGPT प्रश्नांसाठी वापरले जाणारे पाणी कॅलिफोर्नियामध्ये एका बदामाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्याइतके असू शकते.

“प्रत्येक वेळी ChatGPTला प्रश्न विचारला की सहा तास शॉवर सुरू ठेवल्याइतके पाणी खर्च होते आणि ते पाणी पुन्हा वापरता येत नाही,” असा दावा आपण पाहिला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा दावा वास्तविक आकडेवारीशी जुळत नसल्याचे ऑल्टमन यांनी स्पष्ट केले.

‘एकाच वेळी 12 बदाम खाणाऱ्यांनीही विचार करावा’

डेटा सेंटरच्या पाण्याच्या वापराबाबत निर्माण झालेल्या चर्चेवर ऑल्टमन यांनी बदामाचे उदाहरण दिले. एका व्यक्तीने एकाच वेळी 10-12 बदाम खाल्ले तरी त्यातून होणाऱ्या पाण्याच्या वापराबाबत फारसा विचार केला जात नाही.

मात्र ChatGPTच्या पाण्याच्या वापराबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जाते, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे AIच्या पाण्याच्या वापराबाबत चर्चा करताना इतर दैनंदिन वस्तू आणि त्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या संसाधनांचीही तुलना केली पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद होता.

Sam Altman ChatGPT Water Usage
Knee Surgery | गुडघेदुखीवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी...

आधुनिक डेटा सेंटरमध्ये कूलिंगची पद्धत बदलली

डेटा सेंटरच्या पाण्याच्या वापराबाबत ऑल्टमन यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. पूर्वी काही डेटा सेंटरमध्ये Evaporative Cooling म्हणजे बाष्पीभवनावर आधारित कूलिंग पद्धतीचा वापर केला जात होता. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पाणी खर्च होत होते.

मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार आधुनिक डेटा सेंटरमध्ये अशा जुन्या पद्धतींचा वापर केला जात नाही. आता कूलिंग तंत्रज्ञानात सुधारणा झाली आहे.

Sam Altman ChatGPT Water Usage
Healthy Brain | मेंदू निरोगी ठेवण्यासाठी...

‘मोठ्या डेटा सेंटरचा पाणी वापर ऑफिस बिल्डिंगएवढा’

ऑल्टमन यांनी असा दावा केला की, आधुनिक आणि मोठ्या डेटा सेंटरचा पाण्याचा वापर सामान्य ऑफिस बिल्डिंगमधील सिंक, टॉयलेट आणि इतर दैनंदिन वापरासाठी होणाऱ्या पाण्याच्या वापराच्या आसपास असू शकतो. त्यामुळे “एका ChatGPTच्या प्रश्नासाठी प्रचंड प्रमाणात पाणी खर्च होते” हा सोशल मीडियावरील दावा खरा नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

AIचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांच काय?

ऑल्टमन यांच्या स्पष्टीकरणामुळे ChatGPTच्या पाण्याच्या वापराबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही अतिशयोक्त दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, याचा अर्थ AIच्या डेटा सेंटरचा पर्यावरणावर होणारा परिणाम नगण्य आहे, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही.

डेटा सेंटरचा पाणी, वीज, ऊर्जा निर्मिती आणि स्थानिक पायाभूत सुविधांवरील परिणाम हा डेटा सेंटर कुठे आहे, कोणती कूलिंग प्रणाली वापरली जाते आणि वीज कुठून मिळते यावर अवलंबून असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news