

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या दुनियेत नवी क्रांती घडवणार्या तंत्रज्ञानाने आता आले आहे. ओपन-एआयने जीपीटी-६ ॲस्ट्रा हे एआयचे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. हे तंत्रज्ञान अत्यंत वेगवान, पूर्णत: माणसासारखे विचार करते आणि सुरक्षेशी संबंधित धोके कमी करण्यासाठी यात कडक सुरक्षा उपाय जोडल्याचे कंपनीने म्हटले आहे. या तंत्रज्ञानामुळे एआयच्या दुनियेत बदल होऊन आता आपण आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (एजीआय) च्या युगात प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जीपीटी-६ ॲस्ट्राचे लाँचिंग करताना सर्वात आधी ओपन-एआयच्या डे-ब्रेक चाचणी कार्यक्रमाशी जोडलेल्या बिझनेस युजर्सना याचा ॲक्सेस देण्यात आला आहे. हे मॉडेल सुरुवातीला काही निवडक संस्थांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर लवकरच ते सर्व चॅट-जीपीटी प्लस, प्रो, बिझनेस व इंटरप्रायजेस वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिले जाईल. याशिवाय डेव्हलपर्सना हे ओपन-एआय एपीआय आणि ॲमेझॉन वेब सव्हिसेस (एडब्ल्यूएस)द्वारे मिळेल, असे ओपन-एआयने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. ओपन-एआयने बरोबर वर्षापूर्वी जीपीटी-५ रिलिज केले होते. आता कंपनीने ॲस्ट्रा मॉडेल बाजारात आणले आहे. अर्थात, फ्री-टायर आणि सर्वात स्वस्त प्लॅन असलेल्या युजर्सना सध्या तरी याचा वापर करता येणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ही कामे करू शकते ॲस्ट्रा
स्वतःच्या बळावर वेबसाइट्स बनवणे
डेटा ॲनालिसिस (विश्लेषण)
गेम्स विकसित करणे
कोडिंग व सायबर सुरक्षेशी संबंधित कामे हाताळण्यात सक्षम.
उदाहरण : फ्लॅट किंवा अपार्टमेंट शोधण्यासाठी सुमारे ६ तास लागायचे. या मॉडेलने ते
१० मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण केले.
कंपनीचा दावा : संगणकावर तुम्ही करीत असलेले प्रत्येक काम ॲस्ट्रा तुमच्यापेक्षा कित्येक पट वेगाने करू शकते.