

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी आणि गारवा मिळवण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. यामध्ये रेफ्रिजरेटर, पंखे, एअर कंडिशनर आणि कूलर यांसारख्या थंडावा देणाऱ्या भारीतल्या उपकरणांचाही वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने विजेची बिलाच्या झळा खिशाला बसतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त वापरले जाणारे उपकरण म्हणजे एअर कंडिशनर ( AC in summer ) ते जर काटेकोरपणे नाही वापरले तर तुमच्या खिशाला मात्र कात्री लागू शकते. आधुनिक 'एसी' कमी ऊर्जा वापरत असले तरीही , ते तुमच्या मासिक वीज बजेटमध्ये चांगलाच भर टाकत असतात. पाहूया सोप्या टिप्स ज्या तुमचे 'एसी'चे बिल कमी करण्यास मदत करतील.
'एसी' बंद करताना बरेच जण रिमोट कंट्रोलचा वापर करतात. त्यांना वाटत असतं की, एससी बंद झाला; पण यामुळे जरी हे उपकरण निष्क्रिय स्वरूपात जाते. या स्थितीत फक्त एसीचा कॉम्प्रेसर निष्क्रिय हाेतो. जेणेकरून AC चालू केल्यावर तो त्वरित पुन्हा सुरू व्हावा या उद्देशाने. मात्र विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे एसी बंद केल्याची खात्री करावी.
अनेकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा आपण तापमान सेटिंग कमी करतो, तेव्हा AC अधिक चांगले कूलिंग देईल. करेल. मात्र तसे होत नाही, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ( बीईई ) नुसार मानवी शरीरासाठी २४ अंश हे आदर्शवत तापमान आहे. त्यामुळे AC चे हे तापमानाचे लक्ष्य साध्य करणे अशक्य होते. म्हणजे तुम्ही जर AC चे तापमान optimum level ला सेट केले तर, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.
सध्या बाजारात उपलब्ध असलेला प्रत्येक एसी वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार टायमर सेटची सुविधा उपलब्ध करून देतो; पण बरेच लोक ही सुविधा वापरत नाहीत. एसीमधील Timer चे फीचर तुम्हाला ठराविक वेळानंतर एसी बंद करण्यासाठी वेळ शेड्यूल करण्यास मदत करते. ही सुविधा उपकरणाचा अतिरिक्त वापर टाळण्यास मदत करते. तुम्ही एसी बंद करायला विसरलात, तरी तुम्ही सेट केलेल्या वेळेनुसार एसी बंद होऊन, विजेचा अपव्यय कमी होतो.
एसी बंद करण्यापूर्वी तुम्ही तुमची खोली हवेशीर करा. खोलीचे दरवाजे आणि खिडक्या उघडून छताचा पंखा लावल्याने खोलीत अडकलेली उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. असे केल्याने तुमच्या खोलीचे तापमान कमी होईल, जे AC ला जलद थंड होण्यास मदत करेल. यामुळे उर्जेची बचत होण्यास मदत होईल.
एसच्या उत्पादक करणाऱ्या बहुतेक कंपन्या दावा करतात की, एसची नियमित सर्व्हिंसिंग करण्याची काही आवश्यकता नाही. हे काही प्रमाणात खरे असले, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव ही गोष्ट महत्वाची आहे. एसी नेहमीच वापरत नसतो, उन्हाळ्यात काही महिन्यापूरताच त्याचा अधिक वापर हाेत असतो. खूप दिवस वापराविना पडून राहिल्याने त्यामध्ये धूळ, कचरा जाऊन एसीत बिघाड होऊन तो धोकादायक होऊ शकतो. नियमित एसी सर्व्हिसिंग ठेवल्याने त्याची कार्यक्षमता वाढेल परिणामी कमी उर्जेचा वापर होईल.
एसी सुरु असताना तुमची खोली पूर्णपणे बंद असल्याची खात्री करा. हा उपाय त्वरीत आणि दीर्घ कालावधीसाठी खोली थंड करण्यास मदत करेल. थंड हवा बाहेर पडण्याचा मार्ग असल्यास, खोली थंड करण्यासाठी एसीला अतिरिक्त वेळ लागेल परिणामी जास्त वीज खर्च होईल. त्यामुळे रूम पूर्णपणे बंद करूनच एसीचा वापर करायला हवा.
एसी सुरु करताना सीलिंग फॅन कमी किंवा मध्यम वेगाने चालू केल्याने, खोली लवकर थंड होण्यास मदत होते. एकदा तुम्ही तुमचे एसी तापमान इष्टतम (optimum) स्तरावर सेट केल्यानंतर, तुम्ही थंड हवेचा प्रसार वाढवण्यासाठी पंखा देखील चालू केला पाहिजे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एसी चालू असताना उच्च वेगाने छतावरील पंखे वापरणे प्रतिकूल असू शकते. कारण खोली थंड होण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो, सीलिंग फॅनमुळे एसीचा थंडावा खोलीतून पसरेल.