Google आणत आहे ‘हे’ भन्नाट फीचर, काय सर्च केलं हे कळणार नाही

google
google
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्याने आपल्या मोबाईलवर काय शोधले आहे, मोबाईलवर काय काय सर्च करतो, हे चोरून बघण्याची अनेकांना सवय सवय असते, पण आता हे समजणे अशक्य आहे. गेल्या १५ मिनिटांपूर्वी आपण काय शोधले होते? हे आता कोणालाही कळणार नाही. कारण, लवकरच Google स्मार्टफोनमध्ये एक भन्नाट फीचर आणत आहे.

हे वैशिष्ट्य सर्वप्रथम XDA चे डेव्हलपर मिशाल रहमान यांनी समोर आणले होते. या फीचरची उपलब्धता तपासण्यासाठी यूजरला Google App आपल्या Android Mobile वर डाऊनलोड करून घ्यावे लागेल. त्यानंतर Profile picture Icon वर क्लिक करावी. यानंतर तुमच्या अकाउंट सेटिंग्समध्ये पेज ओपन होईल. ज्यामध्ये एक नवीन ऑप्शन मिळेल, ज्यामध्ये लिहले असेल की, तुम्ही शेवटच्या 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री डिलीट करू शकते.

Google ने गेल्या वर्षी जुलैमध्ये Apple iPhone च्या काही उमेदवारांसाठी हे अपडेट सुरू केले होते. पण हे नवीन फीचर सर्व Android Mobile वापकर्त्यांना पुढील काही आठवड्यांपासून उपलब्ध होईल अशी आशा आहे. हे केवळ Android वापकर्त्यांना  डिफॉल्ट गूगल सर्चसाठीच वापरले जाईल. अद्याप हे फीचर डेस्कटॉपवर आणण्याचा विचार करत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. २०२२ या वर्षात ११ आणि १२ मे ला Google आपली Annual Development Conference चे आयोजन करत आहे. या कॉन्फरन्सचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे विनामूल्य पाहता येणार असल्याचेही Google ने सांगितले आहे.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news