Sleep and Vastu : झोपताना ‘या’ दिशेला डोके करण्‍यास आहे विशेष महत्त्‍व

Sleep and Vastu : झोपताना ‘या’ दिशेला डोके करण्‍यास आहे विशेष महत्त्‍व
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झोप ही निरोगी आरोग्‍याचा पाया मानली जाते. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने जसे झोपेचे महत्त्‍व आहे. तसेच वास्‍तूतज्‍ज्ञांनुसार काही विशिष्‍ट दिशेला डोके ठेवून झोपल्‍यास शांत झोपे येते, असे मानले जाते ( Sleep and Vastu ) जाणून घेवूया
वास्‍तूशास्‍त्रातील या नियमांविषयी…

Sleep and Vastu : 'या' दिशेला पाय करुन झोपणे टाळा

वास्‍तूशास्‍त्रानुसार, दक्षिण दिशेला पाय करुन झोपे चुकीचे मानले जाते. कारण दक्षिण दिशा ही यमराजाच्‍या दिशा मानली जाते. या दिशेला पाय करुन झोपल्‍याने आरोग्‍यावर नकारात्‍मक परिणाम होतो. विशेष करुन घरातील ज्‍येष्‍ठ लोक व आजारी व्‍यक्‍तींनी याबाबत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. झोपताना तुमचे डोके हे दक्षिण दिशेला राहिल, अशी तुमची झोपेची व्‍यवस्‍था असावी. (Sleep and Vastu)

अविवाहित मुलींनी दक्षिण आणि पश्‍चिम दिशेला पाय करुन झोपू नये. अविवाहित मुलींनी उत्तरेकडे पाय व दक्षिणेकडे डोके करुन झोपावे, असे वास्‍तूशास्‍त्रात मानले जाते. विवाहित महिलांनी घराच्‍या वायव्‍य कोपर्‍यात कधीच झोपू नये. यामुळे
त्‍यांच्‍यावर मानसिक व शारीरिक परिणाम होवू शकतात, असेही मानले जाते.

(वरील माहिती ही पूर्णपणे वास्‍तूशास्‍त्रातील तज्‍ज्ञांनी दिलेली आहे. वाचकांनी तज्ज्ञांकडून सल्ला घेवूनच पुढील निर्णय घ्यावा….)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news