Vastu and Kitchen : वास्‍तुशास्‍त्रानुसार स्वयंपाक घर कसे असावे?

Kitchen
Kitchen

पुढारी ऑनलाईन डेस्क : वास्तूनुसार घरात पृथ्वी, आकाश, हवा, अग्नी आणि पाणी या घटकांचे योग्य संतुलन असणे गरजेचे आहे. घर स्‍वत:चे असो की भाड्याचे वास्तुमध्‍ये स्वयंपाक घराला (Vastu and Kitchen) विशेष महत्त्व आहे. स्वयंपाक घर हे फायरप्लेस आहे जी घराची ऊर्जा शुद्ध करते आणि अशा प्रकारे तेथे शिजवलेले अन्न शरीराला पोषणही देत असते. वास्तूमध्ये शांतता आणि संपन्नतेसाठी स्वयंपाक घराचे स्‍थानही महत्त्‍वाचे ठरते. घरातील स्वयंपाकघर असे ठिकाण आहे जेथे सर्वांचे पोषण करणारे अन्न शिजवले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार हे ठिकाण फारच महत्त्‍वाचे आहे. स्वयंपाक घर कोणत्‍या दिशेला असावे, ते कसे असावे, कोणत्या गाेष्टी टाळाव्यात याविषयी वास्‍तूशास्‍त्रात काही नियम सांगितले आहेत याविषयी जाणून घेवूया…

Vastu and Kitchen : वास्तूनुसार स्वयंपाकघराची योग्य दिशा म्हणजे घराचा आग्नेय कोपरा, ज्यावर अग्निदेवतेचे राज्य असते.

  • स्वयंपाकघर घराच्या दक्षिण-पूर्व भागात असावे आणि स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड असावे अधिक चांगले मानले जाते.
  •  स्वयंपाकघर उत्तरेस नसावे तसेच स्वयंपाक घराचे दार दक्षिणेस असू नये. ते घराच्या आग्नेय कोपऱ्यात असावे.
  • घर दक्षिणाभिमुख असेल आणि आग्नेयेस स्वयंपाक घर बनवणे अशक्य असेल तर ते वायव्येस बनवावे.
  • स्वयंपाकघराचा कट्टा पूर्व किंवा उत्तर दिशेला न करता तो दक्षिण-पश्चिम असा असावा.
  •  स्वयंपाकघर उत्तरेस ठेवल्याने वास्तूमध्ये संपत्ती राहत नाही.
  •  स्वयंपाकघराच्या दरवाज्यासमोर गॅस असू नये. तसेच, फ्रिज आदी गोष्टी ईशान्येस न ठेवता दक्षिण व उत्तर ठेवाव्यात.
  •  सिंक मुख्यता स्वयंपाक घराच्या उत्तर-पश्चिम भागात ठेवावा. पाणी ठेवण्याची भांडी, नळ आदी ईशान्येस अथवा उत्तरेस ठेवणे उत्तम.
  •  डायनिंग टेबल स्वयंपाक घराच्या पश्चिम किंवा वायव्येस योग्य.
  •  स्वयंपाकघराचा आकार फार लहान नसावा, तो ८० चौरस फूट किंवा त्याहून अधिक असल्यास चांगले.
  •  वास्तुनुसार स्वयंपाकघरातील खिडक्यांसाठी पूर्व दिशा सर्वोत्तम असते. एक्झॉस्ट फॅन पूर्वेला असल्यास उत्तम.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news