Vastu and Devghar : देवघर कसे असावे? वास्‍तुशास्‍त्र काय सांगते… | पुढारी

Vastu and Devghar : देवघर कसे असावे? वास्‍तुशास्‍त्र काय सांगते...

पुढारी ऑनलाईन डेस्क : घर स्‍वत:चे असो की भाड्याचे वास्तुमध्‍ये देवघराला (Vastu and Devghar ) विशेष महत्त्व असते. वास्तूमध्ये शांतता आणि संपन्नतेसाठी देवघराचे स्‍थान महत्त्‍वाचे ठरते. देवघर कोणत्‍या दिशेला असावे, ते कसे असावे, कोणत्या गाेष्टी टाळाव्यात याविषयी वास्‍तूशास्‍त्रात काही नियम सांगितले जातात याविषयी जाणून घेवूया…

Vastu and Devghar : देवघर ईशान्य दिशेला असावे

देवघर हे घरातील ईशान्‍य दिशेला असावे. कारण घरातील सर्वांत पवित्र ठिकाण ईशान्य दिशेला मानले जाते. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते. त्‍यामुळे ईशान्‍य दिशेला विशेष महत्त्‍व आहे.

देवघरात देवांच्‍या मूर्ती व फोटो कधीही भिंतीला टेकवून ठेवू नयेत. यामध्‍ये एक ते दोन इंचाचे अंतर असावे

देवघराच्‍यावर स्‍वच्‍छतागृह असे नये, तसेच देवांच्‍या आकृती आणि रचना त्रिकोणी असू नये. पूजा करणार्‍यांचे तोंड पूर्व अगर उत्तर दिशेस आणि देवांचे मुख हे पश्‍चिम किंवा  पूर्वे दिशेस असावे, असे वास्‍तूशास्‍त्र सांगते.

देवाची मूर्ती आणि फोटो हे दक्षिण भिंतीला लावू नयेत. देवघरासमोर कधीच कपाट असू नये. तसेच शयन कक्षात देवघर कधीही असू नये.

तुमच्या घराच्या पायऱ्यांखाली कधीही देवघर किंवा पूजेचं मंदिर नसावं. देवघराचा दरवाजा दोन दारी असावा. तसेच दरवाजे आपोआप उघडणारे व बंद होणार स्‍पिंग्रचे असू नयेत.

आसन आणि चटईवर बसून पूजा करावी. देवघरात हिंसक आणि अशुभ पक्ष्‍यांची चित्रे असू नयेत. देवघराच्‍या वरील बाजूस कोणत्‍याही प्रकारची अडगळ असू नये.

देवघराच्‍या आग्‍नेय भागात तेल अगर तूपाचा दिवा निरांजन लावावे. तर धूप, उदबत्ती स्‍टँड हे देवघराच्‍या वायव्‍य कोपर्‍यात असावे.

Back to top button