Vastu tips for Trees : घरात सुबत्ता, सकारात्मक ऊर्जेसाठी घरात 'या' वनस्पती हव्यातच | पुढारी

Vastu tips for Trees : घरात सुबत्ता, सकारात्मक ऊर्जेसाठी घरात 'या' वनस्पती हव्यातच

पुढारी ऑनलाईन डेस्क : बऱ्याच वेळा घरातील वातावरण बिघडून गेलेले असते. सततची चिडचीड, ताणतणाव, घरच्या मंडळीत एकमेकांशी असलेला अबोला अशा अनेक कारणांनी घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ( Vastu tips for Trees )  यावर वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रांत काही वनस्पतींना शुभ मानले आहे. अशा वनस्पती घरात ठेवल्याने घरात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते.

Vastu tips for Trees : वास्तुशास्त्रांत काही वनस्पतींना शुभ मानले आहे

१ ) तुळस : भारतीय संस्कृतील तुळस शुभ मानली गेली आहे. जुन्या घरात अंगणात तुळशी वृदांवन असायचे. आताही अनेक जण घरात तुळस लावतात. घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी तुळस आवश्यक आहे. तुळशीत अनेक औषधी गुणधर्मही आहेत.

२)मनीप्लँट : वास्तुशास्त्रानुसार मनीप्लँट घरात ईशान्य दिशेला लावावे. हे समृद्धीचे प्रतीक मानला जाते. घरात सुबत्ता येण्यासाठी मनीप्लँटचे रोप घरात लावणे शुभ मानले जाते.

३ ) कडूलिंब : कडूलिंबचे औषधी उपयोग आपणाला माहितीच आहेत. अनेक औषधांत कडूलिंबाचा उपयोग केला जातो. वास्तुशास्त्रात कडूलिंबाला महत्त्वाचे स्थान आहे. घरात वायव्य दिशेला कडूलिंबाचे झाड लावणे चांगले मानले जाते. सकारात्मक ऊर्जा आणि घरात आरोग्यदायी वातावरणासाठी ते महत्त्वपूर्ण मानले जाते.

४) ऑर्चिड  :  ऑर्चिड हे समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले गेले आहे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आणि घरातील सर्वच सदस्यांच्या प्रगतीसाठी घरात ऑर्चिडचे रोप लावणे योग्य मानले गेले आहे.

५) डॅफोडिल : डॅफोडिल हे रोप विश्वास, सत्य आणि क्षमा यांचे प्रतीक मानण्यात आले आहे. हे रोप उत्तर किंवा वायव्य ईशान्य दिशेला लावावे असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button