Nostradamus Prediction 2026: इराण - अमेरिका युद्ध... नास्त्रेदमसची २०२६ ची भविष्यवाणी खरी ठरतेय, सोने-चांदी गुंतवणुकीचं काय?

Nostradamus Prediction 2026
Nostradamus Prediction 2026pudhari
Published on
Updated on

Nostradamus Prediction 2026: इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. संपूर्ण जगाचं या युद्धाकडं लक्ष लागून राहिलं आहे. जगभरात ऊर्जेचं मोठं संकट निर्माण झालं आहे. हे युद्ध पुढं कुठं जाणार याबाबत देखील अनिश्चितता आहे. दरम्यान, नास्त्रेदमसने २०२६ बाबत केलेल्या भविष्यवाणी चर्चेत आली आहे. त्यांनी या काळात जगात मोठं युद्ध होणार आणि मोठी उलाथा पालथ होणार अशी भविष्यवाणी केली होती. त्यामुळं नास्त्रेदमसची २०२६ साठी केलेली जुनी भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. त्याने सोने चांदीबाबत काय भविष्यवाणी केली होती का याची देखील चाचपणी सुरू झाली आहे.

Nostradamus Prediction 2026
Fuel price relief | इंधनाचा दिलासा

काय होती नास्त्रेदमस भविष्यवाणी?

नास्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीत २०२६ मध्ये कधी सोने चांदी महाग होण्याबाबत थेट उल्लेख केला नव्हता. मात्र त्याने लिहिलेल्या गोष्टी सहसा युद्ध, आर्थिक उलाथपालथ आणि जागतिक अस्थिरता याबाबत इशारा देणारी या स्वरूपात पाहिल्या जातात. आज जगात सुरू असलेलं युद्ध आणि नास्त्रेदमस भविष्यवाणी हे जोडून पाहिलं जात आहे. युद्धाच्या काळात लोकं सोनं आणि चांदीत जास्त गुंतवणूक करत असतात. ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. त्यामुळं याच्या मागणीत वाढ होते आणि किंमती देखील वाढतात. मात्र सध्याच्या घडीला असं काही होताना दिसत नाहीये.

Nostradamus Prediction 2026
Gold Price Fall: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनं 12,000 रुपयांनी स्वस्त; भाव 1 लाख रुपयांपर्यंत खाली येणार?

सोने चांदीचे दर वाढणार?

सध्याच्या घडीला सोने चांदीच्या दरात मोठा चढ उतार होत आहे. तणाव असून देखील सोने आणि चांदीचे दर कोसळत आहेत. याचे मुख्य कारण हे अमेरिकेच्या डॉलरची मजबूती आणि वाढलेले व्याजदर हे आहे. त्यामुळं फक्त युद्धामुळं सोने चांदी दरात वाढ होत नाही. मार्केटमधील इतर गोष्टीचा देखील सोने चांदीच्या दरावर परिणाम होत असतो. यात बँकेचे धोरण आणि डॉलरची किंमत यांची प्रमुख भूमिका असते. नास्त्रेदमसची भविष्यवाणी कोणतीही असो मार्केटची चाल आर्थिक कारणांवर अवलंबून असते.

Nostradamus Prediction 2026
Silver Price Crash: चांदी तब्बल १.६० लाखानं झाली स्वस्त; भाववाढीसाठी युद्धाचं 'पोषक' वातावरण असूनही दर का कोसळतायत?

तिसरं महायुद्ध होणार?

आजकाल लोकं अमेरिका इराण युद्धाचे पर्यावसन तिसऱ्या महायुद्धात होणार का अशी चर्चा करत आहेत. नास्त्रेदमसने देखील आपल्या भविष्यवाणीत मोठ्या युद्धाचा उल्लेख केला आहे. आता या भविष्यवाणीचा संबंध सध्याच्या जागतिक स्थितीशी जोडून पाहिला जात आहे. मात्र सध्याच्या घडीला कोणीही तिसऱ्या महायुद्धाचा स्पष्ट उल्लेख करत नाहीये.

Nostradamus Prediction 2026
Iran Drone Attack Indian Sailor: इराणच्या ड्रोन हल्ल्यात कांदिवलीतील तरुणाचा मृत्यू; ओमानजवळ ऑईल टँकरवर भीषण स्फोट

नास्त्रेदमसची भविष्यवाणी काय सांगते?

नास्त्रेदमसची भविष्यवाणी स्पष्ट अशी नसते. त्याने लिहिलेल्या गोष्टी स्पष्ट स्वरूपात नसतात. त्या इशाऱ्याच्या स्वरूपात असतात. लोकं त्या इशाऱ्याचा आपल्या परीने अर्थ काढत असतात. त्यामुळं एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात.

नास्त्रेदमसच्या भविष्यवाण्या लोकांच्यामध्ये चर्चेचा विषय असतात. या कधी कधी लोकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण करतात. मात्र जागतिक अर्थव्यवस्था ही परिस्थितीवर अवलंबून असते. गुंतवणूक ही भविष्यवाणी नाही तर योग्य माहिती आणि जाणकारांच्या सल्ल्यानं केलेली कधीही चांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news