Iran Drone Attack Indian Sailor: इराणच्या ड्रोन हल्ल्यात कांदिवलीतील तरुणाचा मृत्यू; ओमानजवळ ऑईल टँकरवर भीषण स्फोट

गल्फ ऑफ ओमानमध्ये इराणचा हल्ला; जहाजावरील क्रू मेंबर दीक्षित सोलंकी जागीच ठार, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
भीषण स्फोट
भीषण स्फोटPudhari
Published on
Updated on

मुंबई : इस्त्रायल-अमेरिकेने छेडलेल्या युद्धात प्रतिकार करणाऱ्या इराणने ओमानमध्ये अमेरिकी लष्करी तळांवर चढवलेल्या ड्रोन हल्ल्यांत तेलवाहू जहाजावर काम करणारा कांदिवलीचा दीक्षित सोलंकी (वय 25) ठार झाला.

ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ, गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू ऑईल टँकरवर इराणचा हा ड्रोन हल्ला झाला. त्याच्या तडाख्यात दीक्षितचे जहाज सापडले.

भीषण स्फोट
Israel US Iran War | आखातात अडकले सांगलीतील 44 जण

मार्शल आयलंड्स ध्वज असलेल्या ऑईल टँकरवर तो क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे 52 नॉटिकल मैल अंतरावर या टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचा हल्ला झाला. या हल्ल्यात टँकरच्या इंजिन रूममध्ये भीषण स्फोट होऊन दीक्षितचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी विभागातील आपत्कालीन विभागाने दिली.

दीक्षित हा दीव येथील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. तो काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी मुंबईत आला होता. आणि कांदिवलीत वास्तव्याला होता. महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा जहाजावर कर्तव्याला परतला होता.

भीषण स्फोट
Rajya Sabha Election 2026 | भाजपपासून दूर राहण्याच्या अटीवर शरद पवारांना ‘मविआ’चा पाठिंबा

इराणचा यूएईमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण; इराणी लष्कराचा दावा

इस्रायलने त्वरित हल्ले थांबवावेत : चीनचे

परराष्ट्रमंत्री वांग यी

दोन दिवसांत 650 अमेरिकन सैनिक मारल्याचा इराणचा दावा

इराण युद्धाच्या पाचव्या दिवशी, सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मुजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड

भीषण स्फोट
CM Devendra Fadnavis | देशाला दोन महिने पुरेल इतका तेलसाठा; तातडीने दरवाढ नाही

तेहरान - 150 इराणी विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी; आम्ही शाळांना लक्ष्य करत नाही : अमेरिका

बगदाद विमानतळाजवळ इराकी सैन्याने ड्रोन पाडला

अमेरिकेने इराणमधील 2,000 ठिकाणांवर हल्ला केला : अमेरिकेच्या ॲडमिरलचा दावा

आखाती देशांतील युद्धाच्या भडक्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया 55 पैशांनी कोसळला

भीषण स्फोट
Railway Police Case | होळीसाठी झाडाचा ओंडका चक्क लोकलमधून नेला; 6 जणांवर गुन्हा दाखल

युद्धामुळे निर्देशांक, रुपयाची होरपळ

मुंबई ः अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक व्यापार विस्कळीत होण्याची भीती असून, विदेशी गुंतवणूक संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतली. त्यामुळे सेन्सेक्स 1,122 आणि निफ्टी निर्देशांक 385 अंकांनी कोसळला. विदेशी गुंतवणूक काढून घेतल्याने रुपया आणखी कमकुवत झाला. एका डॉलरचा भाव प्रथमच 92.15 रुपयांच्या नीचांकावर गेला आहे. युद्धामुळे तेलपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा भाव 82 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेला आहे. यूएस डब्ल्यूटीआयचा भाव 75 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news