Silver Price Crash: चांदी तब्बल १.६० लाखानं झाली स्वस्त; भाववाढीसाठी युद्धाचं 'पोषक' वातावरण असूनही दर का कोसळतायत?

Silver Price Crash
Silver Price Crashpudhari
Published on
Updated on

Silver Price Crash: सध्या जगात तीन ठिकाणी युद्धाचा भडका उडाला आहे. गेल्या तीन चार वर्षापासून युक्रेन आणि रशिया यांच्यात लष्करी संघर्ष सुरू आहे. तर इराण - इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्षामुळं मध्य पूर्व आशियातील वातावरण ढवळून निघालं आहे. हार्मुझ सामुद्रधुनीमधून होणारी तेलाची वाहतूक प्रभावित झाल्यामुळं अख्ख जग वेठीस धरलं गेलं आहे. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात देखील सतत लष्करी चकमकी उडत आहेत.

Silver Price Crash
Gold Silver Rates Fall: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण तरी सोने चांदीचे दर का कोसळले?

या सर्व पार्श्वभूमीर शेअर बाजार सातत्यानं मोठ्या अंकांनी कोसळत आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदी यांच्यातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याचे दर देखील गगनाला भिडतात. मात्र सध्या चांदी आणि सोने दरात देखील मोठी घसरण होत आहे.

Silver Price Crash
Gold Silver Price | जळगाव सुवर्णनगरीत सोने - चांदीच्या दरात मोठी पडझड : गुंतवणूकदारांची 'क्रूड ऑईल'कडे कूच

इराण युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत चांदी जवळपास २३ हजार रूपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोने देखील ३००० रूपयांनी कमी झाले आहे. गेल्या २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर त्यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झाला. या हल्ल्यापूर्वी मल्टी कमोडिटी एक्सचेंडमध्ये चांदी वायदे बाजारातील भाव २ लाख ८२ हजार ६४४ रूपये प्रती किलो होता.

हा दर गेल्या आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी कोसळून २ लाख ५९ हजार २७९ रूपये प्रती किलो पर्यत खाली आला. याचे कॅलक्युलेशन केलं तर गेल्या १६ दिवसात कमोडिटी मार्केटमध्ये फक्त १० व्यावसायिक दिवसात १ कोली चांदीचे दर २३ हजार ३६५ रूपयांनी कोसळले आहेत.

Silver Price Crash
Gold Silver Price Drop | सोने अडीच, चांदी 19 हजारांनी स्वस्त

सर्वोच्च दरापासून १.६० लाखानं चांदी स्वस्त

सध्या होणाऱ्या चांदीच्या दराच्या घसरणीची तलुना जर चांदीच्या लाईफ टाईम हाय लेवलशी केली तर चांदी गेल्या काही दिवासांमध्ये चांगलीच स्वस्त झाली आहे. २९ जानेवारी रोजी पहिल्यांदा चांदीचे दर ४ लाख पार गेले होते. चांदी ४ लाख २० हजार ४८ रूपयांच्या रेकॉर्ड दरावर पोहचली होती. त्यानंतर दर कोसळून चांदी आता १ लाख ६० हजार ७६९ रूपयांनी स्वस्त झाली आहे.

सोने दरही कोसळले

गेल्या काही दिवसांमध्ये फक्त चांदी नाही तर सोन्याचे दर देखील कोसळले आहेत. २७ फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रती तोळा १ लाख ६२ हजार १०४ रूपये होता. गेल्या शुक्रवारी हा दर १ लाख ५८ हजार ४०० रूपयांपर्यंत खाली आला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील सोने ३ हजार ७०४ रूपयांनी कमी झाला आहे. सोने आपल्या १ लाख ९३ हजार ९६ या ऑल टाईम हाय स्तरावर जवळपात ३४ हजार ६९६ रूपयांनी खाली आला आहे.

Silver Price Crash
Gold Silver Price | सोने एक हजारने महागले; चांदीची 8 हजारांनी उसळी

सोने चांदीच्या दरात का होतेय घसरण?

जागतिक स्तरावर तीन युद्ध सुरू असूनही सोने चांदीचे दर खाली येण्याचे कारण क्रुड ऑईळमधील किंमतीत होत असलेली वाढ आहे. याचबरोबर डॉलर मजबूत होत अल्यानं सोने चांदीचे दर कोसळत आहेत. क्रुड ऑईल महाग झाल्यानं महागाई वाढत आहे. दुसरीकडं डॉलर मजबूत झाल्यामुळं युद्धासारखी परिस्थीती असूनही सोने आणि चांदीचे दर वाढत नाहीयेत. उच्च व्याजदर आणि मजबूत डॉलर यामुळं सोनं आणि चांदीच्या दरावर दबाव येत आहे. मात्र असं असलं तरी जाणकार सोनं आणि चांदीचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news