पुढारी ऑनलाईन डेस्क : मारुती सुझुकी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी जीम्नी ही कार (Maruti Suzuki New Car) लॉन्च केली. त्यानंतर आता फ्रॉन्क्स ही कार लवकरच लॉन्च होणार आहे. याव्यतिरिक्त आता मारुती सुझुकीच्या चाहत्यांना कंपनीने आणखी एक खुशखबर दिलेली आहे. कंपनीने सध्या एक टीझर लॉन्च केला आहे. हा टीझर (Teaser of new car) कंपनीच्या आगामी नव्या कारचा आहे.
'इन्व्हिक्टो' ही मारुतीची नवी MPV कार लवकरच बाजारात येणार आहे. MPV कार मॉडेलची चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगलेली आहे. याचे कारण म्हणजे ही कार भारतातील सध्याच्या चर्चेतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, एक्सयुव्ही ७०० यासारख्या अनेक प्रसिद्ध कारसोबत स्पर्धेत उतरणार आहे.
मारुतीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिंद्रा कंपनीच्या 'थार' शी स्पर्धा करणारी जीम्नी लॉन्च केली हाेती. थार प्रमाणे जीम्नीचा लुकही हटके आहे. त्यामुळे आता या आगामी कारचा लुक कसा असेल हे पाहण्यात अनेकांनी पसंती दर्शविली आहे. कंपनीने 'इन्व्हिक्टो'चा टीझर लॉन्च केला आहे. या टीझरमधील झलकमधून कारच्या डिझाईनचा प्राथमिक अंदाज येत आहे. (Maruti Suzuki New Car)
कंपनीने कारचा फ्रंट लुक आणि काही माहिती शेअर केली आहे. नवीन टीझरमध्ये कंपनीने स्प्लिट क्रोम ग्रिल आणि एलईडी हेडलॅम्पची झलक दाखवली आहे. याशिवाय लेदरेट फ्रंट सीट आणि व्हेंटिलेटेड सीट फंक्शनसाठीची बटण सुविधा हे इंटीरियर देखील दाखवले आहे. यासोबतच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही कार पेट्रोल-हायब्रिड इंजिनसह सुसज्ज असेल. टीझरमधील 'इन्व्हिक्टो' कारचा इनोव्हा हायक्रॉस प्रमाणेच एकूण बॉडी लेआउट दिसतो. मात्र कारच्या पुढील आणि मागील बाह्य डिझाइनमध्ये फरक आढळून येत आहे.
याआधी, मारुती सुझुकीने 13 जून रोजी या कारच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती. टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसच्या फिचर्स आणि डिझाईनवर आधारित ही एमपीव्ही टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या (TKM) उत्पादन प्रकल्पात तयार केली जाईल. Invicto ची विक्री भारतातील Nexa डीलरशिपद्वारे केली जाईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
Maruti Invicto च्या किमती रु. 18.55-29.99 लाख (दिल्ली, एक्स-शोरूम) दरम्यान असू शकतात. त्याची थेट स्पर्धा टोयोटा इनोव्हा हायक्रॉसशी असेल. याशिवाय कारची Mahindra XUV700, Kia Carens आणि Kia Carnival मधूनही स्पर्धा मिळेल.
हेही वाचा