पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑटोमोबाईल क्षेत्रात विलक्षण वेगाने बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रातील बदल सर्वसामान्यांना थक्क करणारे ठरत आहेत. आता हवेत उडणारी बाईकही आली आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर हवेत उडणार्या बाईकचा व्हायरल व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओने महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनाही भूरळ घातली आहे. त्यांनी Flying bikeचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत यावर आपलं मत व्यक्त केले आहे. .
ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'जपानी स्टार्टअपची उडणारी बाईक. अमेरिकेमध्ये सुमारे $800K खर्च येईल. मला शंका आहे की, ही बाईक प्रामुख्याने जगभरातील पोलिस दलांकडून वापरले जाईल. बर्याच चित्रपटांमध्ये मनोरंजक पाठलाग दृश्यासाठीही वापरली जाऊ शकते."
जगातील पहिल्या उडत्या बाईकचा व्हिडीओ मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जपानी स्टार्टअप कंपनीने ही बाईक तयार केली आहे. XTURISMO हॉव्हर बाईक ६२ mph पर्यंत वेगात ४० मिनिटे उडू शकते. या बाईकचे वजन अंदाजे २९९ किलो (६६१ पाउंड) आहे. नुकतीच अमेरिकेत या बाईकची झलक दाखवण्यात आली आहे. यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हवेत उडणारी बाईक सध्या तरी सर्वसामान्यांना परवडणारी नाही. सध्या या बाईकची किंमत ७ लाख ७७ हजार डॉलर इतकी आहे; पण कंपनीच्या सीईओंनी स्पष्ट केले होते की, लवकरच कमी किंमतीत सुद्धा हवेत उडणार्या दुचाकींची निर्मिती केली जाईल.
हेही वाचा :