

heart attack risk men age 40 to 50: गेल्या दोन दिवसात दोन प्रसिद्ध व्यक्तींचा अचानक अन् मनाला चटका लावून जाणारा मृत्यू झाला आहे. कन्नड अभिनेता दिलीप राज वयाच्या ४७ व्या वर्षी हे जग सोडून गेला तर दिवंगत मुलायम सिंह यांचा छोटा मुलगा प्रतीक यादव यांचा देखील अकाली मृत्यू झाला आहे. या दोन घटनांमुळं पुन्हा एकदा ह्रदय रोग आणि त्यासंबंधीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
दिलीप राज यांना हार्ट अटॅक आल्यानंर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. राज यांच्या निधानामुळं कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.
स्पर्श रूग्णालयाचे प्रमुख कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रंजन शेट्टी अनेक चाळीशी आणि पन्नाशीतील पुरूष अचानक कसे काय कोलॅप्स होत आहेत यामागचे कारण सांगितले. त्यांनी वर्षानुवर्षे धमण्यांमध्ये हळूहळी प्लाक तयार होत असतो त्यानंतर अचानक त्याचा एंडपॉईंट येतो.
ते म्हणाले, 'जरी ही घटना अचानक होत असली तरी ब्लॉकेज हे काही अचानक होत नाहीत. ते हळूहळू सायलेंटली तयार होत असतात. ते तपासात आढळून आलेले नसतात. कधी कधी फॅमिली हिस्ट्री देखील असते जी अनेक लोकांना माहिती नसते. त्यांच्या अनुवंशिकतेत कॉलेस्ट्रॉल हिस्ट्री देखील असते याची कल्पना त्यांना नसते.'
ह्रदय विकाराचा झटका अचानक आणि मोठा आल्याचं आपल्याला दिसतं. मात्र या विकाराची सुरूवात अनेक वर्षांपासून सायलेंटली सुरू असते. फॅटी प्लाग तुमच्या ह्रदयाच्या धमण्यांमध्ये हळू हळू साचत असतात. हा प्लाग उच्च कॉलेस्ट्रॉल, धुम्रमान आणि ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, सततचा तणाव, कमी झोप या सर्वांमुळे तयार होत असतो. यामुळे धमण्या फुगतात आणि कमकुवत होतात. यामुळं धमण्यामध्ये प्लाक जमा होण्याची प्रक्रिया वेग पकडते. ज्यावेळी ही प्रक्रिया होत असते त्यावेळी कोणतीही बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळेच अनेक लोकांना ते ठणठणीत आहेत असं वाटत असतं.
ज्यावेळी यातील एखादा छोटासा प्लाग देखील अनस्टेबल होतो आणि तुटतो. त्यावेळी बॉडी या तुटलेल्या भागाला एखाद्या जखमेसारखं ट्रीट करते. ती त्वरित त्या भागात ब्लड क्लॉट तयार करायला सुरू करते. जर हा ब्लड क्लॉट धमणी पूर्णपणे ब्लॉक करत असेल तर ह्रदयापर्यंत जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं आणि ह्रदयाच्या स्नायूमधील सेल काही मिनिटात मरतात.
जर ब्लॉक धमणी ही महत्वाची असेल तर होणारे नुकसान आणि धोका हा जास्त अन् त्वरित असतो. त्यामुळेच लोकांना मोठा ह्रदय विकाराचा झटका येतो. सहसा तयार होणारा प्लाग हा मोठा नसतो. त्यामुळं संबंधित व्यक्तीला छातीत दुखणे अशा समस्या होत नाहीत. असे छोटे प्लाकच तुटण्याची जास्तीजास्त शक्यता असते. हे अचानक ह्रदयविकाराचा झटका येण्याचे पहिले लक्षण असते.
ज्यावेळी तुम्ही तीव्र शारीरिक श्रम करता, अत्यंत भावनिक तणावातून जाता त्यावेळी स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, झोपेचे सायकल बघिडणे, डीहायड्रेशन, अनियमित रक्तदाब, स्मोकिंग आणि अल्कोहल सेवन यामुळं हा प्लाग तुटण्याची शक्यता वाढते.
हे जे सायलेंट प्लाक आहेत हे दशकापासून तयार होत असतात. कामाचा ताण, मेटाबॉलिक ताण, लाईफस्टाईल दबाव या काळातच वाझलेला असतो. ज्यावेळी पुरूष आपल्या चाळीशीमध्ये पोहोचतो त्यावेळी ते जवळपास दोन दशके सततचा तणाव, झोपेची समस्या, बैठे काम, खराब डाएट, धुम्रपाण, मद्य सेवन, पचनासंबंधीचे उपचार न केलेल्या समस्या, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन रेजिस्टन्स या समस्यांचा सामना करत असतात.
याचा अर्थ तुमच्या शरीराचे नुकास हे हळूहळू तुमच्या तिशीतच सुरू झालेले असते. त्याचे परिणाम किंवा लक्षणे चाळीशी आणि पन्नाशीत दिसू लागतात. तुमचा नॉर्मल दिसणारा कॉलेस्ट्रॉलचा रिपोर्ट हा तुम्हाला खोटा दिलासा देणारा ठरू शकतो. तो रिपोर्ट तुमच्या धमण्यात तयार होणारा प्लाक दाखवत नाही. तो अनेक दिवसांपासून तुमच्या धमण्यांमध्ये तयार होत असतो.
अभिनेते हे दीर्घकाळ शूट करत असतात. त्याचा परिणाम तणाव आणि अनियमित खाणे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असतो. त्यामुळेच गेल्या काही काळात आपण तरूण उमदे फिट दिसणारे अभिनेत्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याचे पाहिले आहे. जरी ते फिट दिसल असले, त्यांचे वजन जास्त दिसत नसलं तरी आतून या सर्व फॅक्टरमुळं तो फॅटी प्लाक तयार होत असेल तर वरची फिट बॉडी ही फसवा फिटनेस रिफ्लेक्ट करते.