Cholesterol: कॉलेस्ट्रॉल किती वाढल्यास हार्ट अटॅक येतो?

पुढारी वृत्तसेवा

आजकाल कॉलेस्ट्रॉल हा शब्द आपण वारंवार ऐकतो. हार्ट अटॅक आणि हृदयरोगामध्ये याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पण तुम्हाला माहित आहे का? कॉलेस्ट्रॉल नेहमीच वाईट नसते!

कॉलेस्ट्रॉल शरीरातील अनेक कामांसाठी गरजेचे असते:

नवीन पेशींची निर्मिती करणे.

हार्मोन्सची निर्मिती करणे.

इतर शारीरिक कार्यांना गती देणे.

लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) यालाच 'बॅड कॉलेस्ट्रॉल' म्हणतात.

हे रक्तवाहिन्यांमध्ये साठून ब्लॉकेजेस निर्माण करते.

यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो, जो हार्ट अटॅकचे मुख्य कारण ठरतो.

हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) याला 'गुड कॉलेस्ट्रॉल' म्हणतात.

हे शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते.

हृदयाच्या आरोग्यासाठी याचा स्तर योग्य असणे गरजेचे आहे.

Michael Austin

तुमच्या रक्तातील दोन्ही कॉलेस्ट्रॉलचे एकत्रित प्रमाण 200 मिलीग्राम प्रति डेसीलिटर पेक्षा जास्त असेल, तर हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

LDL (बॅड कॉलेस्ट्रॉल) चा स्तर 100 मिलीग्राम प्रति डेसीलिटर पेक्षा कमी असणे आरोग्यासाठी हिताचे आहे.

एचडीएल कॉलेस्ट्रॉलचा स्तर 40 मिलीग्राम प्रति डेसीलिटर पेक्षा कमी झाल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त वाढते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी वजन नियंत्रित ठेवा, व्यसने वेळीच आवरा, ताण तणाव आटोक्यात ठेवा, व्यायाम करा.

Heart Attack | pudhari