Heart Attack: हार्ट अटॅकचा धोका टाळायचा आहे? मग 'ही' एक चाचणी नक्की करा
पुढारी वृत्तसेवा
मधुमेह आणि रक्तदाबाची चर्चा नेहमीच होते, पण आपण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे कोलेस्ट्रोल! वाढलेले कोलेस्ट्रोल हे हार्ट अटॅकचे मुख्य कारण ठरू शकते.
Heart Attack | file photo
हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी 'लिपिड प्रोफाइल' ही सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. या एका चाचणीमुळे तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका किती आहे, याची अचूक माहिती मिळते.
लिपिड प्रोफाइलमध्ये काय तपासले जाते?
LDL (बॅड कोलेस्ट्रोल)
HDL (गुड कोलेस्ट्रोल)
ट्रायग्लिसराइड्स
एकूण कोलेस्ट्रोल
heart
'बॅड कोलेस्ट्रोल' (LDL) शरीरात वाढल्यास त्याची कोणतीही लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत, म्हणूनच याला 'सायलेंट किलर' म्हणतात. हे हळूहळू धमन्यांमध्ये साचते आणि ब्लॉकेजेस निर्माण करते.
canva photo
जर लिपिड प्रोफाइल चाचणीद्वारे कोलेस्ट्रोलचे निदान लवकर झाले, तर डॉक्टर आहारात बदल किंवा उपचारांद्वारे भविष्यातील हार्ट अटॅकचा धोका टाळू शकतात.
चाचणी कधी आणि किती वेळा करावी?
सामान्य व्यक्ती: वयाच्या २० व्या वर्षापासून दर ४ ते ६ वर्षांनी.
मध्यम धोका असल्यास: दर १ ते ३ वर्षांनी.
उच्च धोका (मधुमेह किंवा हृदयविकार असल्यास): दरवर्षी एकदा तरी तपासणी आवश्यक!
लिपिड प्रोफाइलची चाचणी म्हणजे हृदयाचे आरोग्य सांभाळण्याच्या प्रयत्नांची आधारशीला आहे.