Maharashtra HSC 12th Result 2024 | ब्रेकिंग! बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, सोप्या ‘या’ ५ स्टेप्स, पाहा तुमचा निकाल

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि.२१) बारावीचा निकाल जाहीर केला. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता बारावीचा परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC 12th Result 2024) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात आला. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेच्या प्रमाणात २.१२ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकणचा ९७.५१ टक्के एवढा आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबईचा ९१.९५ टक्के आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

मुलींची बाजी

यंदाही मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.६० टक्के आहे. तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४४ टक्के एवढे आहे.

विभागवार निकाल

पुणे ९४.४४ टक्के
नागपूर ९२.१२ टक्के
छत्रपती संभाजीनगर ९४.०८ टक्के
मुंबई ९१.९५ टक्के
कोल्हापूर ९४.२४ टक्के
अमरावती ९३ टक्के
नाशिक ९४.७१ टक्के
लातूर ९२.३६ टक्के
कोकण ९७.५१ टक्के
एकूण ९३.३७ टक्के

बारावी निकाल
बारावी निकाल

९ विभागीय मंडळ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेतली होती. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील १४ लाख, ३३,०७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

कोल्हापूर विभाग

कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून १ लाख १९ हजार ६३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये ६३ हजार ९८१ मुले, तर ५५ हजार ६५२ मुलींचा समावेश आहे. तीन जिल्ह्यांत १७८ परीक्षा केंद्रे होती.

डिजीलॉकर अ‍ॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवा

विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहवा. निकाल पाहिल्यानंतर निकालाची प्रिंटही घेता येते. त्याचप्रमाणे डिजीलॉकर अ‍ॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.

गुणपडताळणी

ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतः च्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तर पत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छाया प्रतीसाठी बुधवार २२ मे २०२४ ते ०५ जून२०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शुल्क भरता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

'या' वेबसाईटवर पाहा निकाल

बारावीचा निकाल असा पाहाल

  1. वरील वेबसाइटवर जा. तुमच्या फोनच्या इंटरनेट ब्राउझरवर वर नमूद केलेल्या URL पैकी कोणतीही एक टाइप करा.
  2. बारावी परीक्षेच्या निकालाची लिंक शोधा : इयत्ता १२ वी अथवा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा २०२४ निकालाची लिंक या वेबसाइट्सच्या होम पेजवर दिसेल. ती लिंक ओपन करा.
  3. लॉग इन करा : तुम्हाला तुमचा बोर्ड परीक्षा रोल नंबर प्रविष्ट करायला हवा. यासोबतच तुमच्या आईचे नावदेखील नमूद करा. अर्जात आईचे नाव नमूद केले नसल्यास त्याऐवजी 'XXX' वापरा.
  4. तपशील सबमिट करा : एकदा पूर्ण झाल्यावर तपशील सबमिट करा आणि पेज लोड होण्याची प्रतीक्षा करा.
  5. तुमचा निकाल तपासा आणि प्रिंटआउट घ्या : तुमचा बारावीचा निकाल पुढील पेजवर दिसेल. तुमचे गुण तपासा, पेज डाउनलोड करा अथवा भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news