तब्‍बल १३ इंच लांबीची केळी : रिलायन्‍स कंपनी ‘या’ शेतकऱ्याची ग्राहक  | पुढारी

तब्‍बल १३ इंच लांबीची केळी : रिलायन्‍स कंपनी 'या' शेतकऱ्याची ग्राहक 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश राज्यातील बरवनी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क १३ इंच केळीचे उत्पादन घेतले आहे. या केळीची खरेदी अंबानी यांच्या रिलायन्‍स कंपनीने केली आहे. या केळ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  मागणी आहे. पाहूया या १३ इंच केळीची गोष्ट.  (Agri Success Story)

चक्क १३ इंच लांबीची केळी 

मध्य प्रदेश राज्यातील बरवनी जिल्ह्यातील बगूद गावातील अरविंद जाट या शेतकऱ्याने केळीचे उत्पादन घेतले आहे. या केळीच्या उत्पादनात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. केळी साधारणत: सात ते आठ इंच प्रमाणात येते; पण अरविंद यांनी घेतलेली केळी चक्क १३ इंच लांबीची आहेत. या आश्चर्यकारक पिकामूळे कृषी तज्ज्ञ‍ही आवाक झाले आहेत. तलून येथील कृषी विज्ञान केंद्र येथील तज्ज्ञ‍ांनी या केळांची पाहणी केली असता; त्यांनीही आश्चर्य व्यक्‍त केले आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत या जिल्ह्यात आठ ते नऊ इंच केळीचे उत्पादन घेतले आहे. एवढ्या लांबीचे ( १३ इंच केळ) केळ ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. अरविंद यांनी केळीचे उत्पादन सहा एकरमध्ये घेतले आहे. एका केळाचे वजन साधारणत: २५० ग्रॅम आहे.

अंबानींच्या रिलायन्स कंपनीनेही केली खरेदी

अरविंद जाट यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात दिल्ली येथील अंबानी यांच्या रिलाईन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी या केळीची खरेदी केली आहे. इराण आणि इराकमधूनही तब्बल १० ते १२ टन केळीची निर्यात केली आहे. त्यांनी सांगितले की, हे उत्पादन घ्यायला जेवढा खर्च झाला त्याच्या तिप्पट फायदा झाला आहे.

गेले ३७ वर्षे केळीचे पीक 

अरविंद हे गेले  ३७ वर्षे केळीचे पीक घेत आहेत. प्रदीर्घ शेती अनूभवाचा फायदा हे पीक घेताना होतो.  या पिकाची लावण कशी करायची, खत कोणते आणि कधी घालायचे याचा अंदाज आला आहे. यामूळे हे विक्रमी पिक घेता आले आहे. या केळीला स्थानिक बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक भाव मिळतो असे अरविंद सांगतात. स्थानिक व्यापारी केळी खरेदी करताना खराब झालेला माल खरेदी करत नाहीत; पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील व्यापारी खराब झालेल्या मालाची खरेदी चांगल्या मालाच्या दरात करतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या केळीचा दर एका किलोला १५.५० रुपयेच्या आसपास मिळतो.

हेही वाचलतं का ? 

Back to top button