How buying fresh vegetables : बायकोचा ओरडा टाळण्यासाठी भाज्या खरेदीच्या ‘या’ आहेत टिप्स | पुढारी

How buying fresh vegetables : बायकोचा ओरडा टाळण्यासाठी भाज्या खरेदीच्या 'या' आहेत टिप्स

पुढारी ऑनलाईन डेस्क

भाज्या आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहेत.  भाज्यात मिनरल्स, व्हिटॅमिन्स, फायबर्स भरपूर असल्याने भाज्यांचा जेवणात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. (How buying fresh vegetables) आरोग्यदायी जीवनासाठी चौरस आहार महत्त्वाचा मानला गेला आहे, त्यात भाज्यांना मोठे महत्त्व आहे. (How buying fresh vegetables)

पूर्वी भाजी खरेदीचे डिपार्टमेंट बायकोकडे, आईकडे असायचे. आता मात्र परिस्थिती बदलेली आहे. नवऱ्यालाही भाजी खरेदीसाठी बाजारात चक्कर टाकावी लागते. पण भाजी खरेदी करताना काय काळजी घ्यायची हे माहिती नसल्याने घरात आल्यानंतर मात्र नक्कीच बायकोचे ऐकून घ्यावे लागते.

भाजी खरेदी करताना थोड्या टिप्स लक्षात ठेवल्या तर ताजी आणि चांगली भाजी घेता येईल आणि घरातील पुढचे मन:स्ताप टाकळता येतील.!

१. कोबी – कोबी घेताना तो पांढरट, हलक्या पोपटी रंगाचा असावा पानांना भोक नसलेल्या आणि वास नसलेला कोबी हा ताजा असतो.

२. भेंडी – भेंडी घेताना ती कोवळी आहे का हे ओळखणे अवघड जाते. जर भेंडीचे शेंडा टचकन तुटला तर भेंडी कोवळी आणि ताजी असते. लांब, हिरवी आणि लुसलुशीत अशी भेंडी घ्यावी. भेंडी जाड असेल तर त्यात बी धरलेली असते.

३. टोमॅटो – टोमॅटो घेताना नेहमी फसगत होऊ शकते. टोमॅटो घेताना तो मऊ असेल तर घेऊ नये. कडक आणि जड असलेले टोमॅटो ताजे असतात.

४. वांगी – वांगी घेतना ती वजनाने हलकी असली पाहिजेत आणि त्यांना भोक पडलेले नसावे.

५. काकडी – काकडी घेताना ती पिवळट असून नये. जर पिवळट असेल तर कडवट असण्याची शक्यता आहे.

Back to top button