डाळिंब मोडून द्राक्षे लावली : 55 टन एक्स्पोर्ट झाली | पुढारी

डाळिंब मोडून द्राक्षे लावली : 55 टन एक्स्पोर्ट झाली

सांगोल्यातील शेतकर्‍यास वीरा अ‍ॅग्रोचे वृषाल पाटील आणि हजारे यांचे मार्गदर्शन आले फळास : मंदीतसुद्धा मिळाला 220 चा दर

गोला म्हटले की, आपल्याला आठवतात बोरे आणि डाळिंब पण तेल्या, बिब्या आणि छिद्र पाडून रोपे खराब करणारे भुंगे यामुळे भागातील डाळिंब उत्पादक त्रासला गेला आहे. याच त्रासातून बाहेर पडून द्राक्षशेती करायचा निर्णय घेतला वाकी (ता. सांगोला) येथील रिशाद मुलाणी यांनी. वीरा अ‍ॅग्रोचे तज्ज्ञ मार्गदर्शक वृषाल पाटील आणि हजारे यांनी मुलाणी यांना साथ दिली आणि दीड एकरातील 22 टन द्राक्षे एक्स्पोर्ट झाली. दुसर्‍या प्लॉटमधीलही 25 टन द्राक्षे एक्स्पोर्ट होतील.

म्हणजे जवळपास 50 टन एक्स्पोर्ट दर्जाचा माल तयार झाला आहे. पैकी 22 टन द्राक्षांची 220 रुपये चार किलो दराने विक्री झाली आहे. डाळिंबाची जागा द्राक्षांनी घेतली अन् रिशाद मुलाणी त्यात यशस्वीही झाले. कोंगनोळी येथील पाहुण्यांनी आणि वृषाल पाटील यांनी धाडस करायला लावले आणि डाळिंब शेती मोडून सुपर सोनाक्का जातीची द्राक्ष शेती सुरू केली. 3000 रोपे दोन वर्षांपूर्वी लावली होती.

यावर्षीची खरड छाटणी 1 एप्रिलला तर फळछाटणी 11 ऑक्टोबरला दीड एकर क्षेत्रातील तर 23 ऑक्टोबरला उर्वरित दीड एकर क्षेत्रातील फळछाटणी घेतली होती. त्यानंतर प्रत्येक दहा दिवसाला वीरा अ‍ॅग्रोची टीम प्लॉट व्हिजिट करून औषधे, स्प्रे यांचे शेड्युल देत होती, शेड्युलमध्ये बदल केला नाही. तंतोतंत पाळले. वीरा अ‍ॅग्रोची सर्व उत्पादने व मायक्रो न्यूट्रिएन्ट वापरली आणि निर्यातक्षम दर्जाची द्राक्षे तयार झाली. यंदा द्राक्षांचे दर उतरलेले दिसले तरीही आपल्या मालाचा दर्जा पाहून मुंबई येथील व्यापार्‍याने एक्स्पोर्टसाठी 220 रु. इतका दर दिला. 22 टन निर्यातक्षम माल निघाला तर लोकल मार्केटला चालेल असा 6 टन माल निघाला होता.

आता दुसर्‍या प्लॉटची द्राक्ष काढणी 25 किंवा 26 फेब्रुवारीला सुरू होईल. 1700 रोपांची द्राक्ष काढणी शिल्लक असून निर्यातक्षम दर्जाची किमान 25 टन व लोकल मार्केटला योग्य असा आणखी 6 टन माल निघेल याची खात्री आहे. एकंदर 55 टन एक्स्पोर्ट क्वालिटीची तर 12 टन लोकल देशांतर्गत मार्केटची द्राक्षे उत्पादित झाली. एक्स्पोर्ट क्वालिटीसाठी आपण फारसा अनुभव नसताना वृषाल पाटील व वीरा अ‍ॅग्रोच्या टीममुळे आम्ही यशस्वी झालो याचा आपल्यास अभिमान आहे, असे रिशाद मुलाणी शेवटी बोलताना म्हनाले.

(संपर्क – रिशाद मुलाणी, शेतकरी : 9923270386)

Back to top button