लॅटिन, हिब्रू मजकूर असलेल्या सोन्याच्या ब्रूचचा शोध | पुढारी

लॅटिन, हिब्रू मजकूर असलेल्या सोन्याच्या ब्रूचचा शोध

लंडन : पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक हौशी लोक मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने प्राचीन काळातील वस्तू किंवा सोन्या-चांदीचा खजिना शोधत असतात. आता अशाच एका माणसाला जमिनीत मध्य युगातील सोन्याचा ब्रूच सापडला असून त्यावर लॅटिन व हिब—ू भाषेतील मजकूर आहे. बि—टनमध्ये विल्टशायर येथे हा ब्रूच सापडला असून त्याचा वापर वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी किंवा अन्य धार्मिक कार्यांसाठी केला जात असावा असे संशोधकांना वाटते.

हा ब्रूच सन 1150 ते 1400 दरम्यानच्या काळातील आहे. लॅटिन आणि हिब—ू भाषेत त्यावर देवाला उद्देशून प्रार्थना करण्यात आलेली आहे. पोर्टेबल अँकिक्यूटीज स्कीम (पास) कडून याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोफी हॉक यांनी ही माहिती दिली असून इंग्लंड आणि वेल्समध्ये मेटल डिटेक्टरिस्ट लोक आपल्याला सापडलेल्या अशा वस्तूंची माहिती ‘पास’कडे देत असतात. ही सरकार पुरस्कृत संस्था आहे. त्यावरील मजकुरात जादुटोण्यावेळी वापरण्यात येणारे शब्दही आहेत. काही अतिंद्रिय विधींसाठीही या ब्रूचचा वापर केला जात असावा असेही संशोधकांना वाटते. आठशे वर्षांपूर्वीचा हा ब्रूच सोन्याची एक सुंदर कलाकृती आहे.

Back to top button