

Petrol Car Sales Drop India: भारतात कार खरेदी करणाऱ्यांची आवड आता झपाट्यानं बदलत आहे. भारतीय कार मार्केटमध्ये दीर्घ काळ पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांनी आपलं अधिराज्य गाजवलं होतं. लोकांचा ता सर्वात आवडतीचा पर्याय होता. मात्र गेल्या ऑगस्ट महिन्यात एक धक्कादायक ट्रेंड पहायला मिळाला आहे.
पहिल्यांदाच भारतीय कार मार्केटमध्ये सीएनजी, हायब्रीड आणि इलेक्ट्रेक गाड्यांची विक्री पेट्रोलवरील गाड्यांपेक्षा वाढली आहे. या तीन पर्यायांनी मिळून पॅसेंजर व्हेएकल्सच्या रिटेल विक्रीचा टक्का हा ४२ वर पोहचला आहे. तर पेट्रोलची विक्री ४१ टक्के झाली आहे. ही रेकॉर्ड ब्रेक खालच्या पातळीवर पोहचली आहे.
इंधन ऑप्शनमध्ये बदल झाला असला तरी कारच्या मागणीत काही घट झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात पॅसेंजर गाड्यांच्या रिटेल विक्रीत वर्षाच्या अनुशंगाने १६ टक्क्यांची वाढ जाली आहे. ऑगस्ट महिन्यात पेसेंजर गाड्यांचे ४.०१ लाख युनिट विकले गेले आहेत. म्हणजे ग्राहक गाडी खरेदी करत आहेत मात्र त्यांचा पेट्रेल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी, हायब्रीड अन् इलेक्ट्रिक गाड्यांकडे जास्त ओढा आहे. किंमत, मायलेज, इंधन कॉस्ट आणि नवी टेक्नॉलॉजी हे फॅक्टर कार खरेदीच्या पद्धतीवर प्रभाव पाडतात.
ऑगस्टमध्ये पेट्रोल गाड्यांचा मार्केट शेअर घसरून ४१ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात खालचा स्तर आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पेट्रोल कार मार्केट शेअर ४६ टक्के होती. म्हणजे एका वर्षातच पेट्रोल गाडी खरेदीत ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती लोकप्रियता तसेच हायब्रीड वाहनांची ग्राहकांमध्ये वाढती मागणी ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.
इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये मोठी वाढ झाली आहे. इव्ही गाड्या विक्रीबाबत वर्षाची तुलना केली तर त्यामध्ये तब्बल ५२ टक्क्यांची वाढ जाली आहे. ऑगस्ट महिन्यात जवळपास ३० हजार ७०० युनिट विकले गेले आहेत. आता पॅसेंजर कार बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांच्या हिस्सेदारीच ७.७ टक्यांची वाढी झाली आहे. एका वर्षापूर्वी ही टक्केवारी ५.९ टक्के होती. इलेक्ट्रिक मार्केट शेअर जुलै महिन्यात ८.१ पेक्षा थोडाच कमी होता. ऑगस्ट महिना हा इलेक्ट्रिक कार विक्रीच्या बाबतीत तिसरा सर्वात चांगला महिना ठरला आहे.
सीएनजी गाड्यांच्या बाबतीत मारूती सुझुकीचा दबदबा कायम असून देशात विकल्या जाणाऱ्या सीएनजी गाड्यामध्ये ७१ टक्के गाड्या या एकटी मारूती सुझुकी विकरते. त्यानंतर टाटा मोटर्सचा (१७ टक्के) नंबर लागतो. हुंदाई देखील ९ टक्के सीएनजी गाड्या विकते. सीएनजीने पॅसेंजर मार्केटवर चांगली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.