Surya Grahan 2026 | सूर्यग्रहण १६ की १७ फेब्रुवारीला? 'रिंग ऑफ फायर' भारतात दिसणार का? जाणून घ्‍या सविस्‍तर

Surya Grahan (Annular Solar Eclipse) 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण, खगोलीय घटनेबाबत सर्वत्र उत्सुकता
Surya Grahan (Annular Solar Eclipse) 2026
प्रतीकात्मक छायाचित्र.Pudhari Photo.
Published on
Updated on
Summary
  • २०२६ वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे 'वलयाकार सूर्यग्रहण' असेल

  • यामध्ये चंद्र सूर्याला अशा पद्धतीने झाकतो की, सूर्याच्या कडा एखाद्या तेजस्वी कड्याप्रमाणे चमकताना दिसतात

  • यालाच 'रिंग ऑफ फायर' असे म्हटले जाते.

Surya Grahan (Annular Solar Eclipse) 2026

नवी दिल्‍ली : वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाबाबत सध्या सर्वत्र उत्सुकता पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्‍यात होणार्‍या या ग्रहणाची नेमकी तारीख, वेळ, सूतक काळ याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया...

२०२६ चे पहिले सूर्यग्रहण का आहे खास ?

२०२६ वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'वलयाकार सूर्यग्रहण' (Annular Solar Eclipse) असणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. मात्र, वलयाकार सूर्यग्रहण हे खग्रास (Total Solar Eclipse) सूर्यग्रहणापेक्षा वेगळे असते.खग्रास सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून घेतो, ज्यामुळे पृथ्वीच्या काही भागांत दिवसाही काळोख दाटून येतो.वलयाकार सूर्यग्रहण: यामध्ये चंद्र पृथ्वीपासून अधिक अंतरावर असल्याने तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. परिणामी, सूर्याचा मध्यभाग काळवंडलेला दिसतो आणि बाजूने प्रकाशाचे एक वर्तुळ तयार होते.लॅटिन शब्द ‘Annular’ चा अर्थ 'वलयाकार' किंवा 'अंगठीच्या आकाराचे' असा होतो. हे ग्रहण पाहणाऱ्यांना चंद्राच्या काळ्या आकृतीभोवती आगीच्या कड्यासारखी (Ring of Fire) तेजस्वी कडा पाहायला मिळते.

Surya Grahan (Annular Solar Eclipse) 2026
Astrology Predictions 2026: गुरु-मंगळ ग्रहाचे वर्चस्व, २०२६ वर्ष भारतासह जगासमोरील आव्हाने वाढविणार!

वर्षातील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारीला

वर्ष २०२६ मधील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची घटना असून ज्योतिषशास्त्रातही याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. हे ग्रहण कोणत्या नक्षत्रात लागेल आणि त्याचा सूतक काळ पाळायचा की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

Surya Grahan (Annular Solar Eclipse) 2026
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध

काय आहे ग्रहणाची वेळ?

मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे हे ग्रहण 'वलयाकार सूर्यग्रहण' असेल. यामध्ये चंद्र सूर्याला अशा पद्धतीने झाकतो की, सूर्याच्या कडा एखाद्या तेजस्वी कड्याप्रमाणे चमकताना दिसतात. यालाच 'रिंग ऑफ फायर' असे म्हटले जाते. ग्रहणाची सुरुवात: दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी तर समाप्ती: सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी होणार आहे.

Surya Grahan (Annular Solar Eclipse) 2026
बुध ग्रहाच्या पोटात हिर्‍यांचा जाड स्तर

भारतात दिसणार का?

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात दुपारची वेळ असल्याने हे ग्रहण इथून पाहता येणार नाही. अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया, मॉरिशस, चिली आणि अर्जेंटिना यांसारख्या देशांमध्ये हे ग्रहण दृश्यमान असेल.

Surya Grahan (Annular Solar Eclipse) 2026
Sun Disappear: सूर्य अचानक गायब झाला तर काय?

सूतक काळ पाळायचा का?

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण जिथे दिसते तिथेच सूतक काळ पाळला जातो. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे येथे सूतक काळ लागू होणार नाही. परिणामी, या काळात कोणतीही शुभ कामे करू नयेत, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Surya Grahan (Annular Solar Eclipse) 2026
ISRO Mini Mars Ladakh | 'इस्त्रो'कडून मंगळ मोहिमेची तयारी सुरु; लडाखमधील 'मिनी मार्स'वर HOPE मोहिमेस प्रारंभ...

कोणत्‍या राशी आणि नक्षत्रावर पडणार प्रभाव

ज्योतिष शास्‍त्रानुसार, हे सूर्यग्रहण कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींवर आणि धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर या ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञ किंवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news