बुध ग्रहाच्या पोटात हिर्‍यांचा जाड स्तर

नव्या संशोधनावरून याबाबतचे रहस्य उलगडण्यात यश
Mercury Might Have 15-Km Layer Of Diamonds
बुध ग्रहाच्या पोटात हिर्‍यांचा जाड स्तरPudhari File Photo

बीजिंग : बुध ग्रह अक्षरशः हिर्‍यांनी मढलेला आहे, असे एका नव्या संशोधनावरून दिसून आले आहे. या ग्रहाच्या जमिनीखाली 15 किलोमीटर जाडीचा हिर्‍यांचा दाट स्तर असल्याचे या संशोधनावरून आढळले. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्या संशोधनावरून बुधाची रचना आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण चुंबकीय क्षेत्र याबाबतचे रहस्य उलगडण्यात यश मिळू शकते.

Mercury Might Have 15-Km Layer Of Diamonds
बुध ग्रहाची मिळाली पहिली झलक

पृष्ठभागापासून 485 किलोमीटर वर हिर्‍यांचा स्तर

बुध हा ग्रह नेहमीच संशोधकांसाठी कुतुहलाचा आणि रहस्यमय असा राहिलेला आहे. त्याच्याबाबतची अनेक रहस्ये असून त्यापैकी एक रहस्य म्हणजे त्याचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण असे चुंबकीय क्षेत्र. जरी ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या तुलनेत कमजोर असले तरी असणेही आश्चर्याचे आहे. याचे कारण म्हणजे बुध हा अतिशय छोट्या आकाराचा ग्रह असून तो भूगर्भीयद़ृष्ट्या म्हणजेच जिओलॉजिकली निष्क्रिय आहे. ‘नासा’च्या मेसेंजर यानाच्या मोहिमेत त्याच्या पृष्ठभागावर अनेक काळे ठिपके दिसून आले होते. ते कार्बनचे एक प्रतिरुप असलेल्या ग्राफाईटचे असल्याचे नंतर स्पष्ट झाले. ग्राफाईटबाबतच्या या खुलाशानंतर यानहाओ लिन या संशोधकाचे कुतूहल अधिक चाळवले. ते चीनच्या बीजिंगमधील सेंटर फॉर हाय प्रेशर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च या संस्थेमधील संशोधक आहेत. बुध ग्रहातील कार्बनचे उच्च प्रमाण पाहता त्याच्या अंतर्गत भागात काही तरी विशेष असू शकेल, असे मला वाटले, असे त्यांनी सांगितले. 2019 मधील एका संशोधनावरून आढळले होते की त्याचा मँटल हा आधीच्या अनुमानापेक्षा बराच खोल म्हणजे पृष्ठभागापासून 50 किलोमीटर खोलीवर आहे. कोअर आणि मँटलदरम्यानच्या सीमेवरील उच्च तापमान आणि दाबामुळे तेथील कार्बनचे रुपांतर हिर्‍यांमध्ये झाले आहे. लिन यांच्या नेतृत्वाखाली चिनी व बेल्जियन संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले. त्यामध्ये आढळले की बुध ग्रहाच्या पोटात 15 किलोमीटर जाडीचा हिर्‍यांचा स्तर आहे. तो पृष्ठभागापासून 485 किलोमीटर खोलीवर असू शकतो.

Mercury Might Have 15-Km Layer Of Diamonds
‘जेम्स वेब’ उलगडणार ‘त्या’ फुगीर ग्रहाचे रहस्य

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news