Union Budget 2026 Rare Earth Minerals: चीनची मक्तेदारी संपण्यासाठी सरकारची 'दक्षिणे'कडे धाव... अर्थमंत्र्यांकडून विशेष कॉरिडोरची घोषणा

यासाठी प्रोडक्शन आणि इंडियन आयपी, सप्लाय चेन तयार करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
Union Budget 2026 Rare Earth Minerals
Union Budget 2026 Rare Earth Mineralspudhari photo
Published on
Updated on

Union Budget 2026 Rare Earth Minerals: संसदेच्या पटलावर वार्षिक अर्थसंकल्प ठेवण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जागतिक राजकारणाचा फोकल पॉईंट बनलेला आणि आगामी आर्थिक शक्तीच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाचे असलेले रेअर अर्थ मिनरल्स आणि सेमी कंडक्टर याबाबत जास्त भर दिला आहे. याद्वारे रेअर अर्थ मिनरल्स मार्केटमधील चीनवरील आपलं अवलंबत्व कमी करण्याच्या दृष्टीकोणातून पावले टाकण्यात आली आहेत.

Union Budget 2026 Rare Earth Minerals
Union Budget 2026 | महिलांसाठी 'लखपति दीदी'नंतर आता 'सी-मार्ट' योजनेची घोषणा; व्यवसायासाठी मिळणार स्वस्त कर्ज

याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या. भारताचा सेमी कंडक्टर मोहीम अजून तीव्र करण्यावर भर आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटसाठी ४० हजार कोटी रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली. यासाठी प्रोडक्शन आणि इंडियन आयपी, सप्लाय चेन तयार करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

Union Budget 2026 Rare Earth Minerals
Union Budget 2026 Tradition: निर्मला सीतारमण ७५ वर्षाची परंपरा मोडणार; भाषणाच्या पार्ट B मध्ये करणार मोठा बदल?

सेमीकंडक्टरबाबत काय घोषणा?

सायंटिफिक रिव्ह्यू करण्यासाठी १००० मान्यताप्राप्त क्लिनिकल साईट्स तयार करण्यात येणार आहेत.

प्रोडक्शन, इंडियन आयपी, सप्लाय चेनसाठी विशेष तरतूद

इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट तयार करण्यासाठी ४० हजार कोटी रूपयांची तरतूद

रेअर अर्थ मटेरिअलसाठी ओडिसा, तमिळनाडू आंध्र प्रेदशमध्ये विशेष फॅसिलिटी निर्माण करण्यात येणार आहे. याद्वारे मिनरल पार्क तयार केले जातील.

Union Budget 2026 Rare Earth Minerals
Union Budget 2026 Real Estate: आता छोट्या शहरांकडे फोकस.... रिअल इस्टेट क्षेत्रासाठी मोठी घोषणा

रेअर अर्थ मिनरल्स का महत्वाचे?

भारतानं रेअर अर्थ मिनरल्सबाबत दूरगामी परिणाम लक्षात घेऊन रणनैतिक आणि भू राजकीय दृष्टीकोणातून सरकारनं रेअर अर्थ मिनरल्स आणि सेमी कंडक्टर्स यावर विशेष लक्ष यंदाच्या अर्थसंकल्पात दिलं आहे.

रेअर अर्थ मिनरल्स हे इलेक्ट्रिक गाड्या, शाश्वत उर्जा तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स, कन्जुयमर इलेक्ट्रॉनिक्स आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्याच्या घडीला जागतिक रेअर अर्थ मिनरल्समध्ये चीनची मक्तेदारी आहे. त्याची सप्लाय चेन, प्रोसेसिंग यामध्ये चीनशिवाय जगाचं पान हलत नाही.

Union Budget 2026 Rare Earth Minerals
Union Budget 2026 : निर्मला सीतारमण यांनी पोटली उघडली... काय झालं स्वस्त तर कुठं बसणार खिशाला चाट?

अर्थमंत्री काय म्हणाल्या?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात रेअर अर्थ मिनरल्स आणि सेमी कंडक्टर्स बाबत मोठी घेषणा करताना सांगितलं की आम्ही भारतात रेअर अर्थ मिनरल्स इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक विशेष रेअर अर्थ मिनिरल्स कॉरिडोर तयार करणार आहोत. यात खनिजाच्या दृष्टीकोणातून संपन्न असलेल्या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. हा कॉरिडोर हा केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांचा समावेश आहे. तिथं खाणकाम, खनिज प्रक्रिया, संशोधन आणि उत्पादन यावर भर देण्यात येणार आहे.

Union Budget 2026 Rare Earth Minerals
Union Budget 2026 Kay Points: निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील १० प्रमुख मुद्दे

चीनची मक्तेदारी

चीन सध्याच्या घडीला जगातील ९० टक्के रेअर अर्थ मिनिरल प्रक्रिया उद्योग नियंत्रित करतो. रेअर अर्थ मिनरल्समध्ये १७ धातूंचा समावेश होतो. यात neodymium, dysprosium and lanthanum या महत्वाच्या धातूंचा समावेश आहे. हे धातून पर्मनंट मॅग्नेट जे विंड टर्बाईन, इलेक्ट्रिक गाड्या आणि संरक्षण तंत्रज्ञानात वापरले जातात.

विशेष म्हणजे आपण चीनच्या तुलनेत रेअर अर्थ मिनरल्सच्या स्पर्धेत मागे पडण्याचे कारण आपल्याकडील याच्यावर प्रोसेसिंग करण्याची कमकूवत क्षमता हे आहे. या खनिजांचे मोठे साठे भारतात देखील आहेत. तसेच या क्षेत्रात मर्यादित खासगीकरण आणि धोरणात्मकदृष्ट्या सातत्याचा अभाव ही देखील कारणे आहेत.

आता नव्या कॉरिडोरच्या घोषणेमुळे हा या रेअर अर्थ इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या पायभूत सुविधांचा गॅप भरून निघण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी खनिज काढण्यापासून त्याचे शुद्धीकरण, उत्पादन आणि संशोधन याचा हब तयार करण्यात येणार आहे.

Union Budget 2026 Rare Earth Minerals
Union Budget 2026 : स्वतंत्र भारतातील असे दोन अर्थमंत्री, जे अर्थसंकल्प सादर करू शकले नाहीत… त्यामागे होते मोठे कारण

टायमिंग महत्वाचे

भारताच्या या धोरणाचे टायमिंग अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. सध्याच्या घडीला अमेरिका आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर चीनने देखील काऊंटर अटॅक करत रेअर अर्थ मिनरल्सच्या पुरवठा प्रभावित केला आहे. त्यामुळे अनेक देशांना रेअर अर्थ मिनिरल्सच्या दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्याबाबत भाग पाडले गेले आहे.

या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात भारताने एन्ड टू एन्ड देशांतर्गत क्षमता निर्माण करणे तसेच राज्य स्तरावर याबाबत विशेषता निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. याद्वारे चीनवरील या क्षेत्रातील अवलंबत्व कमी करण्याचे धोरण आहे.

या कॉरिडोअरच्या माध्यमातून खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा आणि जागतिक भागीदारी करण्यासाठीचा देखील प्रयत्न केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news