Union Budget 2026 Kay Points: निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील १० प्रमुख मुद्दे

Union Budget 2026 Kay Points
Union Budget 2026 Kay Pointspudhari photo
Published on
Updated on

Union Budget 2026 Kay Factors: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि. १ फेब्रुवारी २०२६) आपला रेकॉर्ड ९ वा अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या कर्तव्य भवन मधील पहिला अर्थसंकल्प ठरला आहे. त्या नव्या संसद भवनात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री बनल्या आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पाकडे देशातील मध्यम वर्गाचे तसेच पदेशातील गुंतवणूकादारांचे देखील मोठे लक्ष लागून राहिले होते. जागतिक अस्थिरता आणि रोज बदलणाऱ्या टॅरिफच्या जगात भारत कशा प्रकारे आर्थिक स्थैर्य आणणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण महत्वाचे मानले जात आहे.

१ अर्थसंकल्पाची तीन कर्तव्ये

आमचे पहिले कर्तव्य म्हणजे जलद आणि शाश्वत आर्थिक विकास राखणे.

आमचे दुसरे कर्तव्य म्हणजे आपल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या क्षमता विकसित करणे.

आमचे तिसरे कर्तव्य म्हणजे "सबका साथ, सबका विकास" या दृष्टिकोनानुसार विकास साध्य करणे.

२) सात हाय स्पीड ट्रेन कॉरिडोअर

मुंबई-पुणे, पुणे-हैदारबाद, हैदराबाद-चैन्नई, दिल्ली-वाराणसी, वाराणसी-सिलीगुडी, हैदराबाद - बंगळुरू, चेन्नई-बंगळुरू या मार्गावर हाय स्पीड ट्रेन कॉरिडोअर तयार करण्यात येणार आहेत.

३) कॅन्सरची औषधे स्वस्त होणार

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सितारमण यांनी देशातील मधूमेह, कॅन्सर सारख्या आजारांची भीषणता लक्षात घेत, महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी दुर्धर आजारांसाठी कमी दरात औषधं उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशात मधूमेह, कॅन्सर आजारावरची औषधं स्वस्त करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

४) सेमीकंडटक्टरकडे विशेष लक्ष

निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात देशातील सेमीकंडक्टर निर्मितीला बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

५ ) बायोफार्मा शक्ती मिशन

सरकारनं आगामी पाच वर्षांमध्ये १० हजार करोड रूपये बायो फार्मा शक्तीसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उद्येश हा देशात बायोफार्मा क्षमतेला मजबूती देणे हा आहे.

६) खाण कॉरिडोअर

सीतारमण यांनी सांगितलं की अत्याधुनिक टूल रूम निर्माण केले जातील. याचबरोबर केरळ आणि तमिळनाडूमध्ये नवीन खाण कॉरिडोर विकसीत केले जाणार आहे. औद्योगिक क्षेत्राला उत्तेजना मिळणार आहे.

७) क्रीडा साहित्य उद्योगाला चालना

अर्थमंत्री सीतारामन यांनी उच्च-गुणवत्तेच्या क्रीडा साहित्याच्या उत्पादन आणि संशोधनासाठी एका विशेष उपक्रमाचा प्रस्ताव मांडला आहे. "उच्च-गुणवत्तेच्या आणि परवडणाऱ्या क्रीडा साहित्यासाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याची क्षमता भारतात आहे," असे त्या म्हणाल्या.

८) रेअर अर्थ कॉरिडोअर

ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या चार राज्यात रेअर अर्थ कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार आहेत. याद्वारे खनीज आणि स्थायी चुंबक उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल.

९) SME विकास फंड

छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या सशक्तीकरणासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १० हजार कोटी रूपये विशेष ME ग्रोथ फंड ची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे रोजगार निर्मितीला देखील प्रोत्साहन मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news