Union Budget 2026 Real Estate: आता छोट्या शहरांकडे फोकस.... रिअल इस्टेट क्षेत्रासाठी मोठी घोषणा

Union Budget 2026 Real Estate: आता छोट्या शहरांकडे फोकस.... रिअल इस्टेट क्षेत्रासाठी मोठी घोषणा
Published on
Updated on

Union Budget 2026 Real Estate: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेच्या पटलावर वार्षिक अर्थसंकल्प ठेवला. यात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अनेक क्षेत्रांसोबतच रिअर इस्टेट क्षेत्रासाठी देखील निर्मला सीतारमण यांनी चांगल्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी Real Estate Investment Trusts ची घोषणा करून त्याच्या माध्यामातून इस्टेटचे रिसायकलिंगला चालना देण्याचा प्रयत्न केला.

रिडेव्हलमेंटवर फोकस

हे नवीन मॉडेल डेव्हलपर्स आणि सरकारी संस्थाना आपल्या जुन्या डेड संपती मॉनिटाईज करण्यासाठी परवानगी मिळणार आहे. यातून मिळालेला पैसा हा नवीव प्रोजेक्टमध्ये पुन्हा गुंतवला जाऊ शकतो. यामुळे मार्केटमध्ये कॅश फ्लो वाढण्याचा अंदाज आहे. तर या सेक्टरमध्ये पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तसेच अॅसेट रिसायकलिंगचे हे तंत्र प्रोजेक्ट्समधील फंड्सची कमतरता ही समस्या दूर करण्यासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

छोट्या शहरांवर फोकस

सरकारचे लक्ष हे महानगरावरून टीयर २ आणि टीयर ३ शहरांवर आलं आहे. या ठिकाणी पायभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि व्यावसायिक संस्थांना देण्यात येणाऱ्या मदतीद्वारे एक कॉर्पोरेट फ्रेंडली वातावरण तायर होणार आहे. त्यामुळं छोट्या शहरात व्यापार करण्यात सुलभता येईल. तसेच ५ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या अशलेल्या शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर विकासावर कायम भर राहणार आहे. त्यामुळे रहीवासी इस्टेटच्या किंमतीत आणि मागणीत दोन्हीमध्ये सकारात्मक वाढ होण्याची शक्यता आहे.

याचबरोबर बजेटमध्ये ७ हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर करण्यात येणार आहेत. तसेच २० नवीन राष्ट्रीय जलमार्गांचा प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. तसेच कॉरिडोअर दिल्ली वाराणसी, वाराणसी सिलीगुडी या क्षेत्रात लॉजेस्टिक हब, वेअरहाऊस, टाऊनशिप या द्वारे विकासाच्या चांगल्या संधी निर्माण केल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news