Budget 2026: शाळा-कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स उघडणार; गेमिंग क्षेत्रात 10 लाख रोजगाराच्या संधी

Budget 2026 Content Creator Labs: केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये कंटेंट क्रिएटर्स आणि गेमिंग क्षेत्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. देशातील 15 हजार शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स सुरू होणार आहेत.
Budget 2026 Content Creator Labs
Budget 2026 Content Creator LabsPudhari
Published on
Updated on

Government Announces ABGC Content Creator Labs Across India:

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये कंटेंट क्रिएटर्स आणि गेमिंग क्षेत्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, देशातील डिजिटल आणि क्रिएटर इकॉनॉमीला बळ देण्यासाठी 15 हजार शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ सुरू केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

या बजेटमध्ये गेमिंग क्षेत्रात 10 लाखांहून अधिक व्यावसायिकांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे प्रशिक्षित व्यावसायिक विद्यार्थ्यांना आणि तरुणांना कंटेंट क्रिएशनचे विविध पैलू शिकवणार आहेत. यामुळे युट्यूब, सोशल मीडिया, गेमिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या तरुणांना मोठा फायदा होणार आहे.

शाळा–कॉलेजमध्ये शिकवले जाणार कंटेंट क्रिएशन

सरकारच्या या उपक्रमांतर्गत एनीमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी उभारल्या जाणाऱ्या लॅब्समधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे क्रिएटर इकॉनॉमीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

Budget 2026 Content Creator Labs
Stock Market Today: अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; निफ्टी 25,300च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

काय आहेत ABGC कंटेंट क्रिएटर लॅब्स?

या नव्या लॅब्सना ABGC कंटेंट क्रिएटर लॅब्स असे नाव देण्यात आले आहे.
ABGC म्हणजे –
A : Animation
B : Visual Effects
G : Gaming
C : Comics

या लॅब्सचा उद्देश तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कंटेंट निर्मितीसाठी आवश्यक कौशल्ये शिकवणे हा आहे.

Budget 2026 Content Creator Labs
Budget 2026 Income Tax: 1 एप्रिल 2026 पासून नवी इन्कम टॅक्स प्रणाली लागू; लहान करदात्यांसाठी मोठ्या घोषणा

AI आणि नव्या तंत्रज्ञानावर भर

अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद असल्याचे सांगितले. डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ₹12.2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी, डिजिटल नेटवर्क आणि स्किल डेव्हलपमेंटला चालना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news