Stock Market Today: अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; निफ्टी 25,300च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Stock Market Today: अर्थसंकल्प सादर होत असलेल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली. निफ्टी 25,300 च्या खाली घसरला असून मेटल शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली.
Stock Markets Today Budget 2026
Stock Markets Today Budget 2026Pudhari
Published on
Updated on

Stock Market Today: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे, आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात काहीशी सुस्त झाली आहे. बजेटमुळे आज BSE आणि NSE हे दोन्ही बाजार व्यवहारासाठी खुले असले तरी सुरुवातीला गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसले. निफ्टी निर्देशांक 25,300 च्या खाली घसरला, तर बाजारात मेटल शेअर्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळाली.

आज बाजाराचे लक्ष सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणांकडे लागले आहे. विशेषतः भांडवली खर्च (Capex), पायाभूत सुविधा (Infrastructure) यांना किती चालना दिली जाते, तसेच लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कराबाबत काही दिलासा मिळतो का, याकडे गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. बजेटमधून कोणत्या कंपन्या आणि सेक्टरसाठी सकारात्मक संकेत मिळतात, हेही आज ठरणार आहे.

जागतिक आणि देशांतर्गत संकेत काय आहेत?

शुक्रवारी अमेरिकेच्या तिन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली होती. मात्र तरीही डाऊ जोन्स निर्देशांकाने सलग नवव्या महिन्यात वाढ झाली, जी 2018 नंतरची सर्वात मोठी मासिक वाढ मानली जाते. देशांतर्गत बाजारात मात्र शुक्रवारी तीन दिवसांची तेजी थांबली होती आणि जोरदार विक्री झाली होती.

परदेशी गुंतवणूकदारांकडून (FIIs) विक्रीचा दबाव अद्याप कायम आहे. त्याचबरोबर, मागील सत्रात सोन्या-चांदीच्या दरात मोठी ऐतिहासिक घसरण झाली होती, याचाही परिणाम बाजाराच्या भावनेवर दिसून येत आहे.

Stock Markets Today Budget 2026
Construction Sector Budget Expectations: अर्थसंकल्पाकडे बांधकाम क्षेत्राच्या आशा; दिलासा मिळणार का?

मेटल शेअर्समध्ये मोठी घसरण

आज India VIX (वॉलेटिलिटी इंडेक्स) सुमारे 4.34 टक्क्यांनी वाढला होता, म्हणजेच बाजारातील चढ-उतार वाढले आहेत. स्मॉलकॅप 100 निर्देशांक सुमारे 1.42 टक्क्यांनी घसरला, तर मिडकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसून आला. विशेषतः मेटल सेक्टरमध्ये 3.4 टक्क्यांची घसरण झाली आहे.

याशिवाय आयटी, मीडिया, रिअल्टी, फायनान्शियल, PSU बँक अशा अनेक सेक्टरमध्ये घसरण दिसली. मात्र ऑटो, फार्मा, प्रायव्हेट बँका, हेल्थकेअर आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात खरेदी दिसून आली.

Stock Markets Today Budget 2026
Union Budget 2026 Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या? वाचा सर्व माहिती फक्त एका क्लिकवर

निफ्टीवरील गेनर्स आणि लूजर्स

आजच्या व्यवहारात Sun Pharma, Bajaj Auto, BEL, Power Grid, HDFC Bank, Axis Bank, L&T, UltraTech Cement आणि Kotak Bank हे शेअर्स निफ्टीवर टॉप गेनर्स आहेत.

तर दुसरीकडे Hindalco, Tata Steel, Infosys, Adani Enterprises, Coal India, JSW Steel, Adani Ports आणि Tech Mahindra हे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आणि टॉप लूजर्समध्ये राहिले.

एकूणच, अर्थसंकल्प सादर होईपर्यंत शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. बजेटमधील घोषणांनंतरच बाजाराची पुढील दिशा स्पष्ट होईल, असे बाजारतज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news