

SIP Investment Benefits: शेअर बाजारातील चढ-उतार आणि अनिश्चिततेमुळे आज अनेक गुंतवणूकदार थेट शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी SIP म्हणजेच Systematic Investment Plan कडे वळत आहेत. कारण SIP हा असा मार्ग आहे, ज्या माध्यमातून अगदी कमी रकमेपासून सुरुवात करून तुम्ही मोठा फंड तयार करु शकता. आश्चर्य म्हणजे फक्त दर महिन्याला ₹2000 गुंतवूनही तुम्ही करोडपती बनू शकता.
जर तुम्ही दर महिन्याला ₹2000 SIP मध्ये गुंतवत असाल, तर 10 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक सुमारे ₹4.65 लाखांपर्यंत वाढेल. त्याच गुंतवणुकीला जर तुम्ही 20 वर्षं कायम ठेवलं, तर ती रक्कम ₹19 लाखांपेक्षा जास्त होईल. जर तुम्ही हीच SIP नियमितपणे 32 वर्षं चालू ठेवली, तर तुमची छोटी गुंतवणूक तब्बल ₹1 कोटींवर पोहोचू शकते.
दर महिन्याला ₹2000 म्हणजे वर्षभरात फक्त ₹24,000. 32 वर्षांत मिळून तुम्ही एकूण ₹7.68 लाख गुंतवता. पण कंपाउंडिंगच्या जादूमुळे तुमचे हे ₹8 लाख रुपये तब्बल ₹1 कोटींमध्ये रूपांतरित होतात. म्हणजेच सुमारे ₹92 लाखांचा फायदा फक्त नियमित गुंतवणुकीच्या सवयीमुळे होतो.
SIP म्हणजे Systematic Investment Plan. यात तुम्ही ठराविक कालावधीने (उदा. दर महिन्याला) एक निश्चित रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवता. ही गुंतवणूक कालांतराने व्याजावर व्याज मिळवत वाढत जाते. SIP चं वैशिष्ट्य म्हणजे – कमी रक्कम, जास्त काळ आणि शिस्तबद्ध गुंतवणूक.
कंपाउंडिंग म्हणजेच व्याजावर व्याज मिळणं. उदा. तुम्ही ₹1000 गुंतवले आणि 10% वार्षिक परतावा मिळाला, तर पहिल्या वर्षाअखेर ती रक्कम ₹1100 होईल. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 10% व्याज ₹1100 वर मिळेल म्हणजे ₹1210. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ₹1210 वर व्याज मिळेल — म्हणजे प्रत्येक वर्षी रक्कम थोडी थोडी वाढत जाईल.
SIP चे परिणाम एका दिवसात दिसत नाहीत. यासाठी संयम आणि शिस्त आवश्यक आहे. छोट्या रकमेतून सुरुवात करून, वेळोवेळी SIP रक्कम वाढवत राहिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती दोन्ही वाढू शकते.