TATA Stock Crash: टाटांच्या कंपनीचा शेअर 44 टक्के घसरला; 5 वर्षांत दिला शून्य परतावा, गुंतवणूकदारांची चिंता वाढली

TCS Share Price Fall: TCSचा शेअर ऑल-टाइम हायपासून 44% घसरून पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास शून्य परतावा मिळाला आहे.
TCS Stock Crash
TCS Stock CrashPudhari
Published on
Updated on

TCS Share Price Fall AI Impact: भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या Tata Consultancy Services (TCS) च्या शेअरमध्ये मोठी घसरण सुरूच आहे. शुक्रवारी इंट्राडे व्यवहारात टीसीएसचा शेअर थेट 2,585 रुपयांपर्यंत घसरला, जो मागील पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअरमध्ये विक्री होत आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये 4,592 रुपयांचा ऑल-टाइम हाय गाठल्यानंतर आता हा शेअर सुमारे 44 टक्क्यांनी खाली आला आहे. या घसरणीचा थेट परिणाम कंपनीच्या बाजार भांडवलावर झाला असून ते सुमारे 9.60 लाख कोटी रुपयांवर आले आहे. काही दिवसांपूर्वी देशातील चौथ्या क्रमांकाची कंपनी असलेली टीसीएस आता सहाव्या स्थानावर घसरली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास शून्य परतावा दिला आहे. 22 सप्टेंबर 2020 रोजी शेअर 2,523 रुपयांवर बंद झाला होता आणि कालही तो त्याच पातळीच्या आसपास व्यवहार करत होता. म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांना फारसा फायदा झालेला नाही.

TCS Stock Crash
IT Salary 2026: TCS, Infosysमध्ये इंजिनिअर्सना कमी पगार का मिळतोय? एक्सपर्ट्सनी सांगितलं धक्कादायक कारण

या नव्या विक्रीच्या लाटेमागे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा मोठा घटक मानला जात आहे. अमेरिकेतील Anthropic या एआय स्टार्टअपने कॉर्पोरेट लीगल टीम्ससाठी खास एआय टूल लॉन्च केल्यानंतर आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. त्याचा परिणाम अमेरिकेत लिस्ट असलेल्या Infosys आणि Wipro यांच्या ADR वरही झाला. तेथे एका रात्रीत जवळपास 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

बाजारात अशी भीती व्यक्त केली जात आहे की एआयमुळे आयटी सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर कंपन्यांचे पारंपरिक बिझनेस मॉडेल बदलू शकते. लीगल सर्व्हिस, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि कस्टमर सपोर्टसारख्या क्षेत्रांवरही एआयचा मोठा परिणाम होत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या आयटी कंपन्यांचे शेअर्स विकत आहेत.

TCS Stock Crash
Investment Tips: सोने, चांदी, शेअर बाजार की म्युच्युअल फंड; सध्या कुठे गुंतवणूक करावी? तज्ज्ञांनी दिला सल्ला

काल शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. BSE Sensex सुमारे 1,000 अंकांनी घसरून 82,600 वर आला, तर Nifty 50 336 अंकांनी घसरून 25,500 च्या खाली गेला. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

एकूणच, आयटी क्षेत्रात एआयमुळे वाढलेली अनिश्चितता आणि जागतिक बाजारातील दबाव यामुळे टीसीएससारख्या मोठ्या कंपनीलाही मोठा फटका बसताना दिसत आहे.

नोंद: कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news