Stock Market Today: आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री; निफ्टी 120 अंकांनी खाली, मिड-स्मॉलकॅपमध्येही घसरण

Stock Market Today: आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्रीमुळे आज शेअर बाजारात घसरण झाली असून निफ्टी सुमारे 120 अंकांनी खाली आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही दबाव दिसला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: चार दिवसांच्या तेजीला आज ब्रेक लागला. जागतिक बाजारातून कमकुवत संकेत मिळाल्यामुळे गुरुवारी सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. विशेषतः आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली.

सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स सुमारे 370 अंकांनी घसरून 83.850 च्या आसपास आला, तर निफ्टी जवळपास 120 अंकांनी घसरून 25,840 च्या खाली ट्रेड करत होता. बँक निफ्टीतही घसरण झाली होती.

आयटी, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये विक्री

आज आयटी इंडेक्स जवळपास 2 टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा जोर दिसला. मिडकॅप इंडेक्स सुमारे 450 पॉइंट्सने, तर स्मॉलकॅप जवळपास 160 पॉइंट्सने खाली आला. प्रायव्हेट बँकेचे शेअर्स सोडल्यास जवळपास सर्वच सेक्टर लाल रंगात होते.

परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सलग चौथ्या दिवशी खरेदी केली. त्यांनी सुमारे 429 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी दोन दिवसांच्या खरेदीनंतर आज सुमारे 125 कोटी रुपयांची विक्री केली.

जागतिक बाजारांचे काय संकेत?

अमेरिकन बाजारात काल घसरण झाली. डाओ आणि नॅस्डॅक दोन्ही निर्देशांक खाली बंद झाले. त्यामुळे आज भारतीय बाजारावरही त्याचा परिणाम झाला. जपानचा निक्केई मात्र थोडा मजबूत दिसत होता, तर GIFT निफ्टी सपाट स्थितीत होता.

सोने-चांदीत पुन्हा तेजी

कमोडिटी मार्केटमध्ये पुन्हा तेजी परतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 5.100 डॉलरच्या वर गेलं, तर चांदीत सुमारे 5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर जवळपास 2,000 रुपयांनी वाढला, तर चांदी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त महागली. इराण-अमेरिका तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.

Stock Market Today
Bangladesh Election 2026: मतदानापूर्वीच हिंदूची हत्या; 2024च्या उलथापालथनंतर आज निवडणूक, 299 जागांसाठी मतदान

निकाल आणि महत्त्वाच्या घडामोडी

आज काही मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत. त्यामुळे Coal India, ONGC, Hindalco आणि HUL सारख्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचं लक्ष आहे. दरम्यान, Reserve Bank of India ने बँकांमधील ‘मिस-सेलिंग’वर नवीन मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत.

Stock Market Today
Bangladesh violence |बांगलादेशात मतदानापूर्वी हिंसाचार; आणखी एका हिंदू व्यापाऱ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

आता ग्राहकाची परवानगी नसताना कोणताही विमा किंवा गुंतवणूक प्रॉडक्ट विकता येणार नाही. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. टॅक्स कलेक्शनच्या आघाडीवर मात्र सरकारसाठी चांगली बातमी आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ठरवलेल्या उद्दिष्टांपैकी जवळपास 80 टक्के कर वसुली फेब्रुवारीतच पूर्ण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news