

Stock Market Today: निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजार आज घसरला आहे. सकाळच्या ओपनिंगमध्ये सेंसेक्स साधारण 200 अंकांनी खाली आला, तर निफ्टीमध्येही 80 अंकांची घसरण झाली. बँक निफ्टीने सुरुवातीलाच नवा उच्चांक गाठला असला, तरी लगेचच त्यात घसरण दिसू लागली.
निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी ग्लोबल मार्केट्सकडून नकारात्मक संकेत मिळाले. अमेरिकन बाजारात काल मोठी घसरण झाली. डाओ सलग तिसऱ्या दिवशी 550 अंकांनी घसरला. नॅस्डॅकमध्ये जवळपास 200 अंकांची घसरण झाली आणि तो एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेला. GIFT निफ्टीही 50 अंकांच्या घसरणीसह 26,000 च्या आसपास ट्रेड करत होता. आशियाई बाजारातही तणावाचं वातावरण दिसलं.
अस्थिर बाजाराच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे अमेरिकेसोबतची प्रस्तावित ट्रेड डील होण्याची चिन्हे दिसत आहेत. व्हाइट हाऊसच्या चीफ इकॉनॉमिक अडवायझर यांनीही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांनी सलग पाच दिवस विक्री केल्यानंतर काल कॅश मार्केटमध्ये 442 कोटी रुपयांची मर्यादित खरेदी केली. देशातील म्युच्युअल फंड्स आणि इतर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मात्र सलग 56 दिवसांपासून जोरदार खरेदी सुरूच आहे. काल DII कडून तब्बल 1,466 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
आज अनेक मोठ्या ब्लॉक डील्स होण्याची शक्यता आहे.
Mphasis मध्ये 4,626 कोटी रुपयांची ब्लॉक डील होऊ शकते. Blackstone आपली 9.5% हिस्सेदारी 2,570 रुपयांच्या फ्लोर प्राइसवर विकण्याच्या तयारीत आहे.
Emcure Pharma मध्ये Bain Capital सुमारे 500 कोटी रुपयांना 2% हिस्सेदारी विकण्याची शक्यता.
IPO बाजारात आज दोन कंपन्यांची लिस्टिंग होणार आहे.
PhysicsWallah चे IPO आज बाजारात लिस्ट होणार आहेत. इश्यू प्राइस 109 रुपये असून सबस्क्रिप्शन फारसे चांगले नव्हते.
Emmvee Photovoltaic Power या कंपनीचीही आज लिस्टिंग अपेक्षित आहे.
दरम्यान, Capillary Technologies चे IPO आज बंद होत असून अद्याप हे इश्यू फक्त 50 टक्क्यांपर्यंतच सबस्क्राइब झाले आहेत.